Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 21, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Mangroves Cell commendable job in protecting Marine bio-diversity

मुक्तपीठ टीम

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग ! जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात   

सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा, लांजा मासा, ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. असे करताना त्यांच्या झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४० लाख ७८ हजार ५० रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे.

Mangroves Cell commendable job in protecting Marine bio-diversity            

सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करीत असलेले काम कौतुकास्पद असून अशाप्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणूकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

 

कांदळवन संरक्षणासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी पाऊले- आदित्य ठाकरे            

राज्यातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाने अतिशय महत्वाकांक्षी पाऊले टाकली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले, यात कांदळवन उपजीविका निर्माण, कांदळवन वनीकरण, कांदळवन निसर्ग पर्यटन, कांदळवनावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. राज्यात कांदळवनाचे ३२ हजार हेक्टर आच्छादन आहे. या समृद्ध कांदळवनाचे संरक्षण करताना कांदळवनांना राखीव वनाचा दर्जा देण्याचे काम सुरु असून, भारतीय वन अधिनियमातील कलम ४ नुसार २५१४.११ तर कलम २० अंतर्गत ९७८५.३६ हेक्टर इतके कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.किलोमीटरची वाढ झाली आहे. विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठीची उपाययोजना            

सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमारांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहिला असून शाश्वत मासेमारी करतांना दुर्मिळ आणि संरक्षित प्रजातींचे रक्षण होईल याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तरित्या नुकसानभरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश) एक गादा ( हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलीया (फिनलेस पोर्पोईस) अशा  २६० दुर्मिळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.

 

मागील १५ दिवसातील दिलेली नुकसान भरपाई            

मागील पंधरा दिवसात अशा ३८ प्रकरणात ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवन कक्षाकडून देण्यात आली आहे. ज्यामध्ये २६ ऑलीव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलीया यांना मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या आर्थिक वर्षात अशाप्रकारे ८६ प्रकरणात मच्छिमारांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे.


Tags: CM UddhavKandalvan PratishthanMangrove cellTortoiseturtleकांदळवन प्रतिष्ठानकासवमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात तेवणार इंडिया गेटची अमर जवान ज्योत!

Next Post

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

Next Post
Aprreciation of MPS officers and employees by Marathi Language Department

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!