मुक्तपीठ टीम
राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसेच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत.
कवठेमहंकाळ नगरपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला आहे. रोहित पाटील यांचं राष्ट्रवादी पॅनेल १०, तर शेतकरी विकास पॅनल ६ जागांवर विजयी, तर १ अपक्ष विजयी झाले आहेत.
हिंगोली – औंढा नागनाथ नगरपंचायत
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण ३४ जागांपैकी १४ जागांवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. काँग्रेस ६ तर भाजपा ७ जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला ५ आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळविले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने ३४ पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजपाला मात दिली.
जालना-पाचवी नगरपंचायत
जिल्ह्यातील पाचवी नगर पंचायतीचे निकाल हाती आले असून पाच नगरपंचायती पैकी तीन नगरपंचायती वरती राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा आली जिल्ह्यातील राजेश टोपे यांचा गड असलेल्या घनसांगी तालुक्यातल्या घनसावंगी आणि तीर्थपुरी या नगरपंचायती वरती राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली.
नंदूरबार-धडगाव नगरपंचायत
धडगाव नगर पंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. नगर पंचायतीच्या १७ जागा पैकी शिवसेना १३, काँग्रेस ३ तर भाजपा १ जागेवर विजयी झाली आहे.
नांदेड – माहूर, अर्धापूर, नायगाव नगरपंचायत
नायगांव- १७ जागांपैकी १७ ही जागेवर काँग्रेस विजयी तर अर्धापुर- १७ पैकी १० जागा जिंकत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. भाजप-२ आणि एमआयएमला ३ तर राष्ट्रवादी १ अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत. माहूर- १७ पैकी काँग्रेसला ६, राष्ट्रवादीला ७, भाजपाला एक आणि शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत.
धुळे- साक्री नगरपंचायत
धुळ्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.
औरंगाबाद – सोयगाव नगरपंचायत
सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले
बुलढाणा- मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ जागांकरिता निकाल जाहीर झाला आहे. दोन्ही नगरपंचायतमध्ये भाजपाला एकही मतं मिळाले नसून तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती यश मिळाली आहे. मोताळा नगरपंचायत मध्ये काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागलं. संग्रामपूर नगरपंचायतीच्या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने १२ जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली.
मुरबाड नगरपंचायत
मुरबाड नगरपंचायतीत पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आली आहे. या निवडणुकीत भाजपने १० जागा मिळवत बहुमत मिळवले आहे. एकूण १७ जागांपैकी दहा जागांवर भाजपाने विजय मिळवत बहुमत मिळवले आहे.
शहापूर नगरपंचायत
शहापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने गड राखला आहे. नगरपंचायतीच्या १७ जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यापैकी शिवसेनेला १० जागा मिळाल्या तर भाजपने ७ जागा मिळवल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत
तिवसा नागरपंचयातीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम. काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे .पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राखला गड राखला आहे. तकुली नागरपंचयातीवर युवा स्वाभिमानचे वर्चस्व कायम आहे.
पालघर-विक्रमगड,मोखाडा आणि तलासरी नगरपंचायत
विक्रमगडमध्ये जिजाऊ संघटना प्रणित विक्रमगड विकास आघाडीने १७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली. तर, मोखाडा नगरपंचायती मध्ये शिवसेनेला १७ पैकी ८ जागा मिळाल्या असल्या तरीही भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि जिजाऊ संघटना यांना मिळून नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. तलासरी नगरपंचायती मध्ये सुद्धा निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे विक्रमगडची एक हाती सत्ता जिजाऊ संघटनेकडे गेली असली तरीही मोखाडा आणि तलासरी मध्ये कोण सत्ता काबीज करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक नगरपंचायत
कळवणध्ये नगरपंचायतीच्या एकूण १७ जागा आहेत. त्यापैकी ९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने तीन जागांवर, तर शिवसेना आणि भाजपला केवळ प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक जागा पटकावली आहे. निफाड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने सात जागा या पटकावल्या आहेत.
दिंडोरी मतदारसंघात नगरपंचायत
भारती पवार यांना स्वत:च्या दिंडोरी मतदारसंघात नगरपंचायत निवडणुकीत अपयश आले आहे.
भंडारा नगरपंचायत
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर नगरपंचायत, लाखनी नगरपंचायत आणि मोहाडी नगर पंचायत तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत, मोरगाव अर्जुनी नगरपंचायत आणि सडक अर्जुनी नगरपंचायत या सहा नगरपंचायीसाठी निवडणूक झाली होती. यामध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे.
सिंधुदुर्ग नगरपंचायत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी चारपैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपनेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर त्यांची सत्ता येईल.
कुडाळमध्येही अवघ्या एका जागेने ही नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने ८ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.
यवतमाळ :
कळंब आणि बाभूळगाव राळेगाव या तीन नगर पंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राळेगावमध्ये ११ जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले. तर कळंब, बाभूळगावमध्ये केवळ दोन जागी भाजप उमेदवार आल्याने भाजपला तेव्हड्यावर समाधान मानावे लागले. तर झरी नगर पंचायतमध्ये १७ जागांपैकी केवळ एक जागा भाजपला मिळाली
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती
रायगड जिल्ह्यातील तळा, खालापूर, पोलादपूर म्हसळा, माणगाव आणि पाली या ६ नगपंचायतीसाठी निवडणूक झाली होती.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला चांगले यश मिळाल्याचे दिसत आहे. तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. खालापूर नगरपंचायत सेना-राष्ट्रवादी १० जागा मिळाल्या. पोलादपूर नगरपंचायतीत सेनेचे वर्चस्व आहे. म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.
माणगाव नगरपंचायतीत शिवसेना पुरस्कृत आघाडी आली आहे. पाली नगरपंचायतीत राष्ट्रवादी ६ तर सेना ४ आणि भाजपाला २ तर शेकाप ४ आणि अपक्षाला १ जागा मिळाली आहे. स
जळगाव बोदवड नगरपंचायत
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या एकनाथ खडसे यांना हा एक मोठा धक्का आहे. १७ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच ९ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले आहे मात्र, शशिकांत शिंदे यांना कोरेगावात झटका बसला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ५२ उमेदवार विजयी झाले आहेत. कोरेगावात राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांचा विजय झाला आहे तर शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांचा पॅनल कोरेगावात विजयी झाला आहे. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या १५ उमेदवारांचा विजय झाल्याने राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर शिवसेनेला केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सत्यजित पाटकर यांची सरशी झाली तर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना झटका बसला आहे.
दहीवडीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. येथे राष्ट्रवादीला आठ, भाजपला ५, शिवसेना ३ तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. लोणंद तालुक्यात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. येथे राष्ट्रवादी १०, काँग्रेस ३, भाजप ३ आणि अपक्षाचा एका जागेवर विजय झाला आहे.