मुक्तपीठ टीम
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीच्या राजपथावर संचलन आयोजित करण्यात येणार आहे. मात्र यंदा हे संचलन अर्धा तास उशिराने सुरु होणार आहे. देशाच्या ७५ वर्षात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाचे संचलन उशिरा सुरु होणार आहे. कोरोना सुरक्षा नियम आणि श्रद्धांजली सभेमुळे यंदाची प्रजासत्ताक दिनाचे संचलन उशिरा सुरू होणार आहे.
प्रथमच प्रजासत्ताक संचलन उशिरा…
- नवी दिल्ली जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचे संचलन अर्धा तास उशिराने सुरू होईल.
- दरवर्षी सकाळी १० वाजता संचलन सुरू व्हायचे, मात्र यावेळी ते १०.३० वाजता सुरू होणार आहे.
- हे संचलन रायसीना हिल येथून सुरू होणार असून राजपथ, इंडिया गेट करुन लाल किल्ल्यावर संपणार आहे.
- यावेळी कोरोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेमुळे संचलन उशिरा सुरू होईल.
- सध्या सुरू असलेल्या संचलनाच्या सरावात कोरोना प्रोटोकॉल पाळले जात आहे.
- चित्ररथ आणि पथकांमध्ये सहभागी असलेले जवान आणि कलाकार कोणाला भेटायला जात नाहीत किंवा त्यांच्या जवळही कोणालाही जाऊ दिले जात नाही.
- ते बसमध्ये चढतात आणि सरावात सामील झाल्यानंतर बसमधून निघतात.
- याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना इंडिया गेटवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
- त्यामुळे संचलनाला उशीर होणार आहे.
राजपथावर सुरक्षा कडक करण्यात आली…
- दुसरीकडे गाझीपूर फूलमंडीमध्ये आयईडी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक खबरदारी घेत आहेत.
- दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन राजपथ आणि संचलन मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
- संचलन मार्ग आणि राजपथावर आदी ठिकाणी बॉम्ब निकामी पथकाकडून दिवसातून दोनदा तपासणी केली जात आहे.
- रात्रीच्या वेळीही राजपथावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- दिल्ली पोलिसांनी राजपथावरील सुरक्षा वाढवली आहे.
- जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली आहे.
- लोकांचे चेहरे ओळखण्यासाठी वेगळी सिस्टम लावण्यात आली आहे.
गुप्तचर विभाग आणि लष्कराचं खास लक्ष
- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुप्तचर विभाग (IB) आणि लष्कर, दिल्ली पोलिसांसह सोमवारी राजपथवर पोहोचले.
- सुरक्षा व्यवस्थेचा अनेक स्तरांमधून, सर्व अंगांनी विचार केला जात आहे.
- सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी देशाच्या गुप्तचर विभाग आणि लष्कराने दिल्ली पोलिसांना काही सूचना दिल्या आहेत.
- विशेष म्हणजे २९ डिसेंबरपासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
- मात्र यावेळी गाझीपूर फूलमंडीमध्ये आयईडी सापडल्याने १५ जानेवारीपासून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.