मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने डॉक्टरांच्यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डॉक्टरांच्या वाहतुक भत्त्यात मोठी वाढ केली आहे. विशेषत: कार चालवणाऱ्या तसेच दुचाकी आमि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या डॉक्टरांच्या भत्त्यांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. आता त्यांना जास्तीत जास्त ७१५० रुपये प्रति महिना भत्ता मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत CGHS युनिट्समधील रुग्णालये/फार्मसी/स्टोअरमध्ये काम करणाऱ्या केंद्रीय आरोग्य सेवा (CHS) डॉक्टरांसाठी वाहतूक भत्त्याचा दर विचाराधीन होता. आता केंद्रीय आरोग्य सेवेतील डॉक्टरांना प्रतिमहिना कन्व्हेयन्स अलाऊन्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक वेळी महागाई भत्त्यात ५० टक्क्यांनी वाढ केल्यावर वाहतूक भत्त्याची रक्कम २५ टक्क्यांनी वाढेल.
२० वेळा रुग्णालयात आल्यानंतरच भत्ता
- प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने महिन्यातून किमान सरासरी २० वेळा हॉस्पिटलला येणे आवश्यक आहे.
- परंतू एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची रुग्णालयात येण्याची संख्या २० च्या कमी आणि ६ पेक्षा जास्त आहे तेथे वाहतूक भत्त्यात कपात होणार आहे.
- ही कपात किमान ३७५ रुपये, १७५ रुपये आणि १३० रुपये प्रति महिना असेल.
- जर रुग्णालयात भेटींची संख्या सहापेक्षा कमी असेल तर कोणताही भत्ता मिळनार नाही.
मासिक वेतन बिलासह प्रमाणपत्र सादर करावे
- वाहन भत्त्याचा दावा करणाऱ्या प्रत्येक विशेषज्ञ/वैद्यकीय अधिकाऱ्याला मासिक वेतन बिलासह सर्व अटी पूर्ण करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- ड्युटीवर असताना, रजेवर असताना आणि कोणत्याही तात्पुरत्या बदलीदरम्यान कोणताही वाहतूक भत्ता स्वीकारला जाणार नाही.
- जे वैद्यकीय अधिकारी कार किंवा गाडी वापरत नाही किंवा सर्वात कमी दराने वाहतूक भत्ता काढत आहेत त्यांनाही वेतन बिलासह प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
दैनिक भत्ता किंवा मायलेज भत्ता मिळण्यास पात्र नसणार
शहराच्या महानगरपालिका हद्दीतील ८ किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरून प्रवास करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना कोणताही दैनिक भत्ता घेण्यास पात्र असणार नाही.