Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र परिचय केंद्राचा ‘मराठी भाषा पंधरवडा’, ट्विटर मोहीम, लघुपट, मराठी महतीची व्याख्यानं

January 15, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Marathi Bhasha Pandharvada

मुक्तपीठ टीम

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून मराठीच्या वैविध्यपूर्ण पैलूंवर आधारित ट्विटर मोहीम, लघुपट प्रक्षेपण आणि मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानांचे पुन:प्रसारण करण्यात येणार आहे.

 

मराठी भाषा विभागाच्या निर्देशांनुसार २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते.यावर्षी कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रही विविध कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करणार आहे.

 

विशेष ट्विटर मोहीम आणि लघुपट प्रसारण

१४ जानेवारीपासूनच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या मराठी ट्विटर हँडलवर मराठी खाद्य संस्कृती,सांस्कृतिक वारसा, साहित्य -नृत्य -वस्त्र-आभूषण आदि परंपरांच्या माहितीवर आधारित विशेष ट्विटर मोहीम राबविण्यात येत आहे. मराठीसह परिचय केंद्राच्या हिंदी व इंग्रजी ट्विटर हँडलवरही ही मोहीम आहे. यासोबतच परिचय केंद्राच्या सर्वच समाजमाध्यमांवर १६ जानेवारी रोजी ‘शांतता! मराठीच कोर्ट चालू आहे’ या लघुपटाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

मराठीची महती सांगणाऱ्या पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या औचित्याने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या हीरकमहोत्सवी व्याख्यानमालेतील मराठीची महती सांगणाऱ्या निवडक पाच व्याख्यानांचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

 

‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड्मयाची ओळख’ विषयावर १८ जानेवारी रोजी ख्यातनाम साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे व्याख्यान, २१ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्राची शाहिरी पंरपरा’ विषयावर प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांचे व्याख्यान, २४ जानेवारीला ‘वारी : परंपरा आणि स्वरूप’ विषयावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या व्याख्यानाचे पुन: प्रसारण करण्यात येणार आहे.

 

२५ जानेवारीला खासदार तथा दै.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे ‘जगाच्या पाठीवरील मराठी’ विषयावर आणि २८ जानेवारीला मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या ‘महाराष्ट्रातील लोककला आणि प्रबोधन’ विषयावरील व्याख्यानाच्या पुन: प्रक्षेपणाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप होणार आहे.

 

समाजमाध्यमांवरुन लघुपट प्रसारण व व्याख्यानांचे पुन: प्रसारण

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त एक लघुपट आणि पाच व्याख्यानांच्या पुन: प्रसारणाची वेळ दुपारी ४ वाजताची राहील. परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक, युटयूब चॅनेलहून प्रसारण होणार आहे. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वर पाहता येणार आहे.


Tags: Importance of MarathiMaharashtra Parichaya KendraMarathi Language Conservation FortnightMarathi VadmaymuktpeethRe-broadcast of lecturesSocial media short film broadcastमराठी भाषा विभागमराठी भाषा संवर्धन पंधरवडामराठी वाड्मयमराठीची महतीमुक्तपीठव्याख्यानांचे पुन: प्रसारणसमाजमाध्यम लघुपट प्रसारण
Previous Post

महाराष्ट्रात मोसंबी फळपिकासाठी नवी योजना! पैठणमध्ये “सिट्रस इस्टेट”

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिकांशी संवाद

Next Post
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिकांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!