Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उद्यमशील विद्यार्थी घडवून देशात आदर्श निर्माण करावा व विद्यापीठाचे मानांकन उंचवावे” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोह

January 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
17th Convocation Ceremony of Punyashlok Ahilya Devi Holkar University

मुक्तपीठ टीम

सोलापूर हे औद्योगिक शहर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने स्थानिक उद्योगांना पूरक रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवून उद्यमशील विद्यार्थी घडवावेत, तसेच स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन देशातील विद्यापीठांकरिता आदर्श तयार करावा, असे सांगताना विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले आंतरराष्ट्रीय मानांकनही उंचवावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 

राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. ११) ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झाला त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.

 

कार्यक्रमाला सोलापूर येथून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवश्य शिकावी तसेच फ्रेंच, जर्मन आदी भाषा देखील शिकाव्या; मात्र मातृभाषा व मातृभूमीप्रती आपल्या कर्तव्याला विसरू नये असे राज्यपालांनी सांगितले. 

 

साक्षरतेला संस्कारांची जोड मिळाली नाही तर राक्षस प्रवृत्ती बळावून युवक चुकीच्या मार्गाला जातील असे नमूद करून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मूल्य शिक्षण व संस्कारांना महत्व दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

 

२०२२ वर्ष उजाडले तरी देखील कोविड – १९ संसर्ग कायम आहे. यानंतर कोरोनाला न घाबरता, कोरोना विषयक सुयोग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिल्यास सर्व क्षेत्रात प्रगती कायम ठेवता येईल, असेही राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती केल्यास समाजाला त्याचा फायदा होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

 

राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुवर्णपदके मिळविण्यात विद्यार्थिनी आघाडीवर असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विद्यापीठातील मुले देखील यातून प्रेरणा घेऊन अधिक प्रयत्न करतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

 

विद्यापीठाला शासनाकडून अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी १४ कोटी ७४ लाख रुपये मंजूर झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी अहवालात सांगितले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली असून ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लाखाची निधी मिळाला असून त्यातून शंभर एकर परिसरात क्रिडांगणाची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

दीक्षांत समारोहात १२,२३९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तसेच ६२ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी व ५५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.  प्रातिनिधिक स्वरूपात आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी करुणा उकिरडे  या विद्यार्थिनीचा ४ सुवर्ण पदके मिळाल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Tags: bhagat singh koshyariConvocation CeremonyPunyashlok Ahilya Devi Holkar Universityदीक्षांत समारोहपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभभगत सिंह कोश्यारी
Previous Post

“कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधीत मौजे वेळे पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार”

Next Post

“लोकांच्या जीवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना” – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

Next Post
11th meeting of State Road Safety Council

"लोकांच्या जीवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना" - परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!