Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉक्टर पिसाट गजाआड! नर्सवर भाऊ, मित्रासह सतत बलात्कार! गर्भपातही!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
aurangabad

मुक्तपीठ टीम

डॉक्टरांना देवासारखे मानले जाते. मात्र एखादा डॉक्टरच राक्षसीवृत्तीने वागू लागला सामान्य जनतेने करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. औरंगाबादमध्ये डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने तेथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडितेला फ्लॅटवर आणि हॉटेलात नेऊन अनेकदा बलात्कार केला आहे. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली असता, आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या देऊन विनासंमती तिचा गर्भपात केला आहे. त्यानंतरही डॉक्टर आणि त्याच्या मावस भावानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आता या डॉक्टर पिसाटला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 

दामिनी पथकाच्या मदतीने फिर्याद!

  • याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सिडको बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकाने फोन करून एका २५ वर्षीय तरुणीला मदतीची गरज असून ती प्रचंड घाबरलेली असल्याचं कळवले.
  • त्यामुळे दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या.
  • तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली.
  • तिला विश्वासात घेऊन चौकशी केली.
  • मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टरसह तिघांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • पोलिसांनी डॉ. प्रसाद संजय देशमुख (२४) याला अटक केली आहे.
  • दीपक पाटील, सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलाचा पोलिस शोध घेत आहेत.

 

डॉक्टर पिसाटाची गुन्हेगारी वखवख

  • गारखेड्यातील रुग्णालयात ही पीडिता नर्स म्हणून तीन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
  • याच रुग्णालयातील डॉ. प्रसादने तिच्यासोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं सांगितले.
  • त्यामुळे ती गरोदर राहिली.
  • तर प्रसादने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.
  • पण रक्तस्राव होऊन तीव्र वेदना होत असल्याने ती प्रसादकडे गेली.
  • पण आशा परिस्थितीत सुद्धा प्रसाद याने तिला परत सिडको चौकातील एका नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला.
  • प्रसाद निघून गेल्यानंतर त्याच्या मावस भावानेदेखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
  • परंतु पीडित नर्स त्याच्या तावडीतून सुटून आली.
  • डॉक्टरच्या इतर दोन मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तिने आपल्या तक्रारीत सांगितले.
  • यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: AurangabadCidco Bus stopDoctorNurseऔरंगाबादखासगी रुग्णालयदामिनी पथकनर्ससिडको बसस्थानक
Previous Post

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लातूरमध्ये आवश्यक तयारी!

Next Post

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडर आणि डायरीचे अनावरण

Next Post
राज्य विधी सेवा प्राधिकरण

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडर आणि डायरीचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!