मुक्तपीठ टीम
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती चौकशी करणार आहे. त्यांच्यासोबत पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा) आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल, एनआयएच्या महासंचालकांचे प्रतिनिधी हे समितीत असतील.
सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सर्व रेकॉर्ड चौकशी समितीच्या अध्यक्षा न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्याकडे सोपवण्यास सांगितले आहे. समिती स्थापन करण्याचा मुख्य हेतू हा सुरक्षेत काय चूक झाली? तसेच जबाबदारी कोणाची? भविष्यात असं घडू नये यासाठी काय करता येईल? यासोबतच समिती लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करेल, असा आहे.
हे आहेत कमिटीचे सदस्य
- जस्टिस इंदु मल्होत्रा (अध्यक्ष)
- एनआयएचे डीजी किंवा त्यांचे नियुक्त अधिकारी आयजीच्या दर्जापेक्षा कमी नाहीत
- चंदिगडचे DGP
- पंजाबचे ADGP (सिक्युरिटी)
- पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल
केंद्र आणि राज्य चौकशी बंद
- पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी सुरू केली होती.
- राज्याने गृह सचिव अनुराग वर्मा यांच्यासह उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली.
- त्याच वेळी, केंद्राने सुरक्षा सचिवांच्या अध्यक्षतेखाली इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजी अधिकार्यांसह एक चौकशी समितीही स्थापन केली.
- हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर हे दोन्ही तपास आता बंद झाले आहेत.
- पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी केंद्रीय सुरक्षा संस्था आणि पंजाब पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
- ५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यावर होते.
- तिथं पंतप्रधान मोदी एका राजकीय रॅलीला संबोधित करणार होते.
- आधी ठरल्याप्रमाणे मोदींनी हेलिकॉप्टरनं सभास्थळी पोहोचणे अपेक्षीत होते.
- पण पावसाळी वातावरणामुळे त्यात अचानक बदल झाला आणि ते बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला.
- त्याच प्रवासात स्थानिकांनी चालवलेलं आंदोलनामुळे हुसैनीवालापासून ३० कि.मी. अंतरावर मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबवावा लागला.
या आंदोलकांनी मोदींचा रस्ता ब्लॉक केला. - वीस मिनिटांपर्यंत ताफा एका पुलावरच थांबून राहिला.
- शेवटी मोदी भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले.
- दिल्लीला बसण्यापूर्वी त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जीवंत परतलो अशा आशयाचं वक्तव्य केलं.
- ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
- परिणामी पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचं लक्षात आलं.