मुक्तपीठ टीम
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता पुन्हा स्वस्त सोने विकत आहे. अर्थात हे सोने ग्राहकांना प्रत्यक्षात हाती मिळणार नाही. त्यासाठी १४ जानेवारीपर्यंत सरकारी योजनेचा लाभ घ्यावा लागेल. सॉवरेन गोल्ड बाँड योजना २०२१-२२ अंतर्गत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. सरकार पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. भेसळ, सोने सुरक्षा अशी कोणतीही भीती नसतानाच सरकारी सुरक्षेबरोबरच व्याजाच्या उत्पन्नाचाही फायदा मिळत असतो. त्यामुळे ही योजना सामान्यांना फायद्याची ठरणारी आहे. गुंतवणूक करायची इच्छा असेल तर या योजनेबद्दल महत्वाचे २५ मुद्दे मुक्तपीठच्या वेबसाइटवरील चांगल्य बातम्या कॅटेगरीला भेट देवून समजून घ्या.
सॉवरेन गोल्ड बाँडच्या अत्यंत महत्त्वाच्या १५ गोष्टी
- सॉवरेन गोल्ड बाँड हा सरकारी बॉंड आहे.
- हा बाँड रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने जारी केला आहे.
- हा बाँड डीमॅट स्वरूपात रूपांतरित करणे शक्य असते.
- सॉवरेन गोल्ड बाँड्समध्ये शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
- गोल्ड बाँडची किंमत इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनने प्रकाशित केलेल्या २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या किंमतीशी जोडलेली आहे.
- रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने सॉवरेन गोल्ड बाँडची किंमत ४ हजार ७८६ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट केल्यास प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल.
- एक ग्रॅम सोन्यासाठी ४ हजार ७३६ रुपये मोजावे लागतात.
- खरेदीसाठी जारी केलेली किंमत सेबीच्या अधिकृत ब्रोकरला द्यावी लागेल.
- बाँड विकल्यानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतात.
- सॉवरेन गोल्ड बाँड्स जारी केलेल्या किंमतीवर वार्षिक २.५०% निश्चित व्याज दर देतात.
- हे पैसे दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात पोहोचतात.
- मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नावर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
- गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
- बँक शाखा, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे गुंतवणूक करता येते.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे फायदेच फायदे!
- सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते.
- प्रत्येक सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांना व्याजाची रक्कम हाती येते.
- सॉवरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जात नाही.
- हे सोने प्रत्यक्षात आपल्याकडे नसल्याने ते सुरक्षित ठेवण्याची चिंता नसते.
- सोने आपल्या ताब्यात नसल्यामुळे भीती नसते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे या गुंतवणुकीत सोन्यात भेसळीने होणाऱ्या फसवणुकीची भीती नसते.
- सध्या उपलब्ध कोणत्याही एक्स्चेंजवर सॉवरेन गोल्ड बाँड विकता येऊ शकतात.
- सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड यांच्यामार्फत बॉंडची विक्री केली जाईल.
- कर्ज घेण्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँडचा तारण म्हणून वापर करता येऊ शकतो.
- प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी विक्रीवर जीएसटी किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत.