Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“योग एक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो”- न्यायमूर्ती अभय ओक

कैवल्यधामाची आंतरराष्ट्रीय परिषद लोणावळा येथे संपन्न

January 10, 2022
in घडलं-बिघडलं
0
Abhay Oka at Kaivalyadhama International Conference in lonavala

मुक्तपीठ टीम

कैवल्यधाम योग संस्थान तर्फे लोणावळा येथे कैवल्यधामचा ऑन-साइट अनुभव तसेच व्हर्च्युअल उपस्थिती या दोन्हीसह जगभरातील योग-प्रेमींपर्यंत पोहोचण्यास सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. दैनंदिन परिस्थितीपासून जुनाट आजारांपर्यंत अनेक मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याचा उद्देश्य या आंतरराष्ट्रीय परिषदेचा होता.

 

योग आणि मानसिक आरोग्य: व्याप्ती, पुरावा आणि उत्क्रांती या विषयावरील १०व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्व स्तरावर पारंपारिक योगशास्त्राला आधुनिक मानसशास्त्रीय प्रणालींसह एकत्रित करण्यासाठी भविष्यात वादविवाद आणि चर्चा सुरू ठेवण्यावर सर्व वक्त्यांनी जोर दिला. जागतिक स्तरावर योग आणि मानसिक आरोग्यामध्ये समन्वय विकसित करण्यासाठी वादविवाद आणि चर्चेसाठी जगभरातील २६ प्रख्यात वक्ते परिषदेत उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायाधीश (निवृत्त) बी.एन.श्रीकृष्ण, न्यायमूर्ती रमेश धानुका आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परिषदेचे उदघाटन करण्यात आले.

 

न्यायमूर्ती ओक म्हणाले की योग्य निर्णय देण्याच्या जड दायित्वाखालील मानसिक ताण आणि हा ताण असलेल्या न्यायाधीशांसाठी योग आणि मानसोपचार यांच्यातील परस्परसंवादावर योग तज्ज्ञ उपाय देऊ शकतात. योगाच्या क्षेत्रात जे महान कार्य करत आहेत त्यांचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा राजकीय गटाशी काहीही संबंध नाही, यावर त्यांनी भर दिला. त्यात धर्माचे किंवा कोणत्याही प्रदेशाचे अडथळे नाहीत. योग एक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो जो घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे.

 

न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून सांगितले की शारीरिक आजार मानसिक आरोग्यावर परिणाम करतात आणि योगाच्या माध्यमातून ते हाताळले जाऊ शकते, कारण त्याचा सर्व पैलूंवर ‘कॅस्केडिंग इफेक्ट’ आहे. स्वामी अनुभवानंदजींनी आपल्या प्रवचन ‘आत पहा’ मध्ये सांगितले की जीवनात घडणारी कोणतीही समस्या ही आत पाहण्याची संधी असते. डॉ गणेश राव म्हणाले की पाश्चात्य तत्वज्ञान मनावर थांबते आणि योग मनाच्या पलीकडे जाण्याबद्दल बोलतो. सूत्रसंचालन सुबोध तिवारी यांनी केले.


Tags: Abhay OkaKaivalyadham International Councillonavalayogaकैवल्यधाम आंतरराष्ट्रीय परिषदन्यायमूर्ती अभय ओकालोणावळा
Previous Post

एसटी कृती समितीची पवार-परबांसोबत बैठक! वकील बदलला, आता सदावर्तेंऐवजी पेंडसे! संप संपवण्यांचं आवाहन!

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा

Next Post
Ajit Pawar on Annasaheb Patil Economic Backward Development Corporation

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!