मुक्तपीठ टीम
सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका महिलेचे केस कापताना तिच्या डोक्यावर केसांमध्ये थुंकल्याचे विचित्र कृत्य केल्याचं दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांनी माफी मागितली आहे. मात्र, ते जिच्या डोक्यावर थुंकले, त्या पूजा गुप्ता या महिलेने मात्र त्यांना माफ करण्यास इंकार केला आहे. ते फिल्मी स्टायलीत नाटक करत असल्याचं सांगून त्यांना अद्दल घडवणार असल्याचा निर्धार केला आहे.
पूजा गुप्तांचा जावेद हबिबांविरोधात संताप!
- जावेद हबिब जिच्या डोक्यात थुंकले त्या पूजा गुप्ता या महिलेने त्यांची माफी स्वीकारली नाही. तिने संतप्त स्वरात आपली बाजू मांडली.
- जावेद हबीब यांनी फिल्मी शैलीत मागितलेली माफी स्वीकारणे शक्य नाही.
- त्यांचं वागणं खूपच किळसवाणे आहे. माफी मागण्याच्या नावाखाली ते नाटक करत आहेत.
- जावेद हबीबला शिक्षा व्हावी, यासाठी पूजा लढणार आहेत.
जावेद हबिब महिलेच्या केसात कुठे थुंकले?
- प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब यांनी उत्तरप्रदेशातील काही शहरांमध्ये केश कर्तन कलेचे वर्कशॉप घेतले.
- मुझफ्फरनगरमधील एका जाहीर वर्कशॉपमध्ये ते केस कापताना बरौत येथील महिलेच्या केसांवर थुंकले. ज्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
- त्याचवेळी, दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती महिला म्हणत आहे की, मी रस्त्यावर केस कापून घेईन पण, जावेद हबीबकडे नाही.
- एसएसपी अभिषेक सिंह यांनी व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला.
- जावेद हबीब यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, केसांची देखभाल करताना जावेद हबीब पाण्याच्या कमतरतेचा उल्लेख करत महिलेच्या केसांमध्ये थुंकताना दिसत आहे.
- हा व्हिडिओ मेरठ रोडवरील एका हॉटेलचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
- तीन दिवसांपूर्वी जावेद हबीब यांनी हायवेवर असलेल्या एका हॉटेलमधील वर्कशॉपमध्ये केसांच्या देखभालीबाबत टिप्स दिल्या होत्या, ज्यामध्ये अनेक ब्युटी पार्लरचे संचालक सहभागी झाले होते.
भविष्यात कोणत्याही महिलेसोबत असे होऊ नये!
- स्टेजवर महिलेचा अपमान केल्यास काय शिक्षा आहे, हे ती जावेद हबीब यांना दाखवणार आहे.
- जेणेकरून भविष्यात ते अशाप्रकारे कोणत्याही महिलेचा अपमान करू नये, असे पूजाने म्हटले आहे.
- पूजा गुप्ता यांनी सांगितले की, जावेद एका महिलेकडून फोन करून माफी मागण्यास सांगत आहे, पण त्या कोणत्याही दबावाखाली येणार नाही.
व्हिडिओ पोलिसांच्या हाती
पूजा गुप्ता यांनी सांगितले की, मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मन्सूरपूर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांच्याकडे घटनेशी संबंधित तपासासाठी काही व्हिडिओ मागवले होते, जे त्यांनी पोलिसांना दिले आहेत.