Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे?” – नाना पटोले

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसपीजी गृखात्याच्या अख्त्यारीत येते

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nana patole wants answer from amit shah

मुक्तपीठ टीम

पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपाशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड संताप आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनादररम्यान ७०० शेतक-यांचा मृत्यू असून शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळं पंजाबमधील त्यांच्या सभेला ५०० लोकंही आली नाहीत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आपला हवाईदौरा सोडून रोडमार्गे जायला निघाले होते. मुळात त्यांना सभास्थळी जायचेच नव्हते. त्यामुळे रूपं बदलण्यात तरबेज असणा-या पंतप्रधानांनी काल आपलं एक नविन रूप दाखवून नौटंकी केली. ही बाब पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणली असून पंजाब सरकारच्या चौकशीतून दूध का दूध पानी का पानी होईल आणि पंतप्रधान आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल असे पटोले म्हणाले.

 

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. पंतप्रधानांना शेतक-यांच्या रस्त्यात खिळे ठोकले, शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी म्हणून हिणवले. पण शेतक-यांनी आपला लढा सुरु ठेवला आणि हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली शेतकरी लढवय्या असून तुम्हाला सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही पटोले म्हणाले.

 

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणा-या भाजपा पदाधिका-याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून भाजप किती हीन पातळीवर जाऊन राजकारण करत आहे हे समोर आले असून भाजपची विचारधारा महिलाविरोधी असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. भाजपच्या या गलिच्छ राजकारणाचा आम्ही तीव्र निषेध करतो असे पटोले म्हणाले.

 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असा टोला लगावला.


Tags: Amit Shahnana patolePM Narendra modiPM Security Lapseअमित शाहनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

भंगाराची विल्हेवाट : मध्य रेल्वेला ३५० कोटींची कमाई, भुसावळ विभागाचे सर्वाधिक १५ कोटी

Next Post

कोल्हापुर जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा विजयी, शिवसेना-शेकापला तीन जागा!

Next Post
kolhapur bank

कोल्हापुर जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा विजयी, शिवसेना-शेकापला तीन जागा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!