मुक्तपीठ टीम
स्मशानभूमी म्हटलं की डोळ्यांपुढे नकारात्मक, अत्यंत जुजबी सुविधा व साधने असलेले उदासिन चित्र उभे राहते. पण जवळच्यांना गमावलेल्यांना काहीसा आधार मिळावा अशी सुंदर, सुसज्ज स्मशानभूमी कन्नडमध्ये उभारली गेलीय. त्या स्मशानभूमीत भारलेली सकारात्मकता दु:खातील मनाला उभारी देण्यास मदत करण्याची अपेक्षा आहे.
#कन्नड तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेली देवलोक स्मशानभूमी,हिवरखेडा रोड कन्नड #औरंगाबाद@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@ShivSena@NCPspeaks@TulsidasBhoite@TV9Marathi@saamTVnews@abpmajhatv@ShrimantManey@RRPSpeaks@MLA_UDAYRAJPUT pic.twitter.com/LBDZBrkU5d
— संतोष वसंतराव चव्हाण (@meSantoshChavan) January 5, 2022
घरातील कोणाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर शोककळा पसरलेली असते आणि अशा वेळी अंत्यविधीसाठी होणाऱ्या कष्टांमुळे त्यांच्या दुःखात साहजिकच आणखी भर पडते. परंतु अशा दुःखात बुडालेल्या या कुंटुबांचा संवेदनशीलतेने विचार करुन, दुःखाची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने कन्नड नगर परिषदेचे गटनेते संतोष कोल्हे यांनी एक सुसज्ज आणि सकारात्मकतेने भारलेली स्मशानभूमी उभारण्याचा ध्यास घेतला. अहोरात्र प्रयत्न करुन विद्यमान नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांच्या सहकार्याने त्यांनी अखेर स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास नेले. ही स्मशानभूमी सुंदर, सुसज्ज आहेच पण तिथं भारलेली सकारात्मकता दु:खातील मनांनाही उभारी देईल, अशी अपेक्षा आहे.
कन्नडच्या स्मशानभूमीत कोणत्या सुविधा?
- केवळ अंत्यविधीचीच सुविधा नाही तर दशक्रिया विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी आहेत.
- अंत्यविधीनंतर नातेवाईक दु:खात असतात, त्यांना त्यावेळी आवश्यक कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागते. ती थांबवण्यावर विचार सुरु आहे.
- अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना अनेकदा स्नान वगैरे करताना त्यांच्या कपडे आणि सामानाची काळजी वाटते, त्याबद्दल नव्या सुविधेवर विचार सुरु आहे.
स्मशानभूमीचे सकारात्मक देवलोक
- स्मशानभूमीच्या परिसरात तब्बल १५४ प्रकारची विविध झाडे लावण्यात आली आहे.
- त्यामुळे परिसर रमणीय आणि हवेशीर झाला आहे.
- अशी ही देवलोक स्मशानभूमी राज्यातच नाही तर देशात आदर्श ठरत आहे.
- या देवलोक स्मशानभूमीमुळे कन्नड नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. असा प्रकल्प आपुलकीने साकारण्यासाठी केवळ आणि केवळ संवेदनशील मातृहृदयच हवे, असं मत कन्नडकर व्यक्त करत आहेत.