मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील, ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती आहे. ही भरती ४८ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ च्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर इंजिनिअर सिव्हील या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा ६५% गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ५५% गुणांसह सिव्हील इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी ५% सुट देण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी उमेदवाराला निदान २-१ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा ६५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी ५% सुट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी ५% सुट देण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल पदासाठी उमेदवाराला निदान २-१ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय हे १फेब्रुवारी २०२१ रोजी २० ते ३० वर्ष असावे. एससी / एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट तर ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षाची सूट देण्यात आली आहे.
शुल्क
या पदासाठी जनरल आणि ओबीसीसाठी ४५० रुपये शुल्क तर एससी / एसटीसाठी ५० रुपये शुल्क आकारले आहेत.
अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in माहिती मिळवू शकता.