मुक्तपीठ टीम
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)ने जारी केलेली नवी आकडेवारी धक्कादायक आहे. कोरोना लॉकडाऊननंतर वाढू लागलेल्या रोजगार संधी कोरोनाची गंभीरता वाढत तिसरी लाट उसळत असताना पुन्हा कमी होताना दिसत आहेत. CMIE आकडेवारीनुसार, जिथे बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये ७.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. आधीच्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये सात टक्के होता. बेरोजगारीचा हा दर गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक आहे. देशाचा विचार करता हरियाणात बेरोजगारी सर्वात जास्त तर महाराष्ट्रात सर्वात कमी आहे.
महाराष्ट्रात सर्वात कमी बेरोजगारी!
- हरियाणात बेरोजगारी सर्वात जास्त
- तेथील बेरोजगारीचा दर ३४.१ टक्के नोंदवला
- महाराष्ट्रात सर्वात कमी बेरोजगारीचा दर ३.८ टक्के
- बिहारच्या बेरोजगारीच्या दराबाबत बोलायचे झाले तर ते तेथे १६ टक्के
- झारखंडमध्ये १७.३ टक्के होता. दिल्लीत बेरोजगारीचा दर ९.८ टक्के नोंदवला
बेरोजगारी जास्त कुठे…शहरांमध्ये की गावांमध्ये?
- ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये ७.२८ टक्के
- ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर ७.६४ टक्के
- डिसेंबरमध्ये शहरांमधील बेरोजगारीचा दर ९.३० टक्क्यांपर्यंत पोहोचला
- नोव्हेंबर २०२१ मध्ये शहरांमध्ये बेरोजगारी दर ८.२१ टक्के
नोकरी शोधणाऱ्या ४० लाखांना रोजगार !
CMIEचे सीईओ महेश व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये ४० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रोजगार वाढला आहे परंतु नोकरी शोधणाऱ्यांची संख्या त्याहून दुपटीपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात सुमारे ८३ लाख लोक नोकरीच्या शोधात होते. मात्र, त्यापैकी केवळ ४० लाख नोकरी शोधणाऱ्यांनाच रोजगार मिळाला.