Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकार, कवी, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना ‘कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित

January 3, 2022
in घडलं-बिघडलं
0
Kantilal kadu

मुक्तपीठ टीम

विविध क्षेत्रात राज्यभर आघाडीवर राहून कर्मयोगाचा झेंडा अटकेपार लावणारे पनवेल येथील दै. निर्भीड लेखचे संपादक, कवी, गजलकार, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कार्याची दखल घेत स्व. मधुकरशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि आ. भाई जगताप मित्र मंडळाच्यावतीने ‘कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा ठाकूर ट्रस्टचे अध्यक्ष उमेश ठाकूर आणि भाई जगताप मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयुक्तिकपणे केली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.

राज्याच्या राजशिष्टाचार मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे, सुनील तटकरे, मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत अलिबाग येथील सार्तिजे येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन उमेश ठाकूर यांनी केले असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. यावेळी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच गुणवंत, यशंवत आणि कीर्तीवंत मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.

कांतीलाल कडू यांनी कोरोनासह राज्यभर आरोग्य विभाग आणि खासगी दवाखाने चालकांवर आसूड ओढून रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा दिलासा दिला आहे. तसेच दोन हजाराहून अधिक कोरोना रूग्णांना आपल्याच कुटूंबातील सदस्य मानून त्यांच्यावर उपचार करण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे.

 

कडू हे रायगडसह महाराष्ट्राला पत्रकारितेत वेगळा मापदंड देणारे जहाल संपादक म्हणून परिचित आहेत. रोखठोक भूमिका आणि तितकेच पारदर्शक लिखाण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेली २८ वर्षे ते पत्रकारितेत वाजत-गाजत आहेत. दै. निर्भीड लेखमधून अनेक बदमाशांना ते वठणीवर आणत आहेत. तर भ्रष्ट यंत्रणेला जळी, स्थळी, काष्टी, पाषणी ते दिसत असल्याचा दराराही त्यांनी निर्माण केला आहे.

 

शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातही कांतीलाल कडू यांचे आदबीने नाव घेतले जात आहे, असे त्यांनी कार्य उभारले आहे. अनेक आंदोलनातून त्यांनी राज्य सरकारला वठणीवर आणले आहे. कर्नाळा बँक प्रकरणाच्या तपासाला केवळ कडू यांच्यामुळे चालना मिळाली असून ईडीची कारवाई ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. ठेविदारही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून आहेत.

 

कांतीलाल कडू यांनी सांस्कृतिक क्षेत्रात पनवेलला आघाडीवर ठेवले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या गायकांचे कार्यक्रम आयोजित करून रसिक, श्रोेते, कानसेनांना तृप्तीची अनुभूती दिली आहे. कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या २२ जानेवारीला राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाचे पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे.

 

त्यांचा आज कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान होत आहे. यापूर्वी त्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’, आ. दत्तूशेठ पाटील शैक्षणिक संस्थेच्यावतीने ‘कोरोना देवदूत’, पनवेल भूषण, पनवेल गौरव, समाजरत्न, उत्कृष्ट पत्रकारितेचा पाटील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय शेकडो पुरस्कारांनी त्यांच्या कार्याला सलाम ठोकला आहे.

 

चारोळ्यांचा निःश्‍वास, भावस्पर्श हे त्यांचे चारोळी संग्रह प्रकाशित आहेत. उग्रलेख हे निवडक अग्रलेखांचे पुस्तक त्यांचे गाजले आहे. जीवन प्रवासावर विश्‍वाचे आर्त हा पहिला भागही पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. तर आजानुबाहू हा कविता संग्रह अशी पाच पुस्तके त्यांची गाजत आहेत. त्यांना आज कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


Tags: bhai jagtapColaba Lifetime Achievement National AwardDainik Nirbhidkantilal kaduकांतीलाल कडूकुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार
Previous Post

लेकींनाही दिली ज्ञानाची शक्ती, सावित्रीबाई आमुच्या क्रांतीजोती!

Next Post

“छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादलेल्या निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!”

Next Post
ashish shelar

"छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांवर लादलेल्या निवडणूक खर्चाच्या निर्णयाला स्थगिती द्या!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!