मुक्तपीठ टीम
नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-सी’ पदावर निम्न श्रेणी लिपिक, मॉडेल मेकर, कारपेंटर, कुक, रेंज लास्कर, फायरमन, आर्टी लास्कर, बार्बर, वॉशरमन, एमटीएस गार्डनर अॅंड हेड गार्डनर, एमटीएस वॉचमन, एमटीएस मेसेंजर, एमटीएस सफाईवाला, सायस, एमटीएस लास्कर, इक्विपमेंट रिपेयर, एमटीएस या पदांसाठी एकूण १०७ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १२वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण, आयटीआय (कारपेंटर)
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण, फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
- पद क्र. २,५,७,८,९,१०,११,१२, १३,१४,१५,१६,१७ साठी अर्ज करणारा उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कमांडंट, मुख्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, महाराष्ट्र, पिन- ४२२१०२
अधिक माहितीसाठी भारतीय सेना दलाच्या अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वरून माहिती मिळवू शकता.