मुक्तपीठ टीम
देशात कोरोना विषाणूचा वेगाने वाढत आहे. कोरोनाचा हा वेग पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून चाचण्यांचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. यासोबतच काही लक्षणेही आढळून आल्यास, व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत संबंधित व्यक्तीला संशयित कोरोना बाधित मानले जावे, असे निर्देशही दिले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना एंटीजन चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे, कारण, बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यामुळे आरटी-पीसीआर चाचणी अहवालांना विलंब होऊ शकतो. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना तपास वाढवण्यास सांगितले. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा परिस्थितीत, सरकारने अॅंटीजन चाचण्यांची संख्या वाढवावी. लोकांना स्व-परीक्षण किट वापरण्यास प्रोत्साहित करावे. विशेष म्हणजे, अनेक स्व-परीक्षण किट सरकारने मंजूर केले आहेत.
कोरोना संशयितांची लक्षणे
आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने आज काही लक्षणे दिली आहेत, जी दिसल्यावर एखाद्या व्यक्तीला कोरोना संशयित मानले जाईल. ती लक्षणे म्हणजे खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, अंगदुखी, चव किंवा वास कमी येणे, थकवा आणि अतिसारासह ताप अशी आहेत. ही लक्षणं आढळलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतातील कोरोना आणि ओमायक्रॉनविषाणूची गंभीर स्थिती
- गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ८ हजार ६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी चार प्रकरणे ओमायक्रॉन व्हेरिएंटची आहेत.
- आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आज १ हजार ७६६ रुग्ण बरे झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
- बंगालमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ४५१ रुग्ण आढळले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.
- त्याच वेळी, १ हजार ५१० लोकांचा मृत्यू झाला आहे.
- चंदिगडमध्ये ४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. झारखंडमध्येही कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.