मुक्तपीठ टीम
२६ जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलन चिघळवण्यासाठी आंदोलकांना चिथवणाऱ्या दिप सिध्दूसह जुगराज सिंग,गुरजंट सिंहवर दिल्ली पोलिसांनी १ लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. दिल्ली पोलिसांनी ७ जणांवर कारवाई करण्यासाठी बक्षिस जाहीर केले आहे.
कृषी कायदे रद्द करा अशी मागणी करत दिल्ली सीमांवर ७० दिवसांपासून पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या वेळी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. आंदोलनात सहभागी एका गटाने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता.
या गटातील शेतकऱ्यांवर दिल्ली पोलीस कारवाई करत आहेत. यात सहभागी असणाऱ्या आणि आंदोलनाला चिथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिप सिध्दूसह जुगराज सिंग,गुरजंट सिंहवर पोलिसांनी बक्षिस जाहीर केले आहेत. याची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी १ लाखाचे बक्षिस जाहीर केले आहेत. तसेच जजबीर सिंह, बूटा सिंह, सुखदेव सिंह आणि झकबाल सिंह यांच्या बद्दल माहिती दिल्यास ५० हजारांच्या बक्षिसाची घोषणा केली गेली आहे. हे सर्वजण लाल किल्लात झालेल्या हिंसाचार केलेले आरोपी असून ते फरार आहेत.
एकीकडे दिल्ली पोलीस दिप सिद्धू याला शोधात आहेत. तर दुसरीकडे दीप सिद्धू सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. दीप सिद्ध यांनी आजही एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांने माझ्या विरुद्ध बोलणाऱ्यांना बघून घेईन अशी धमकी दिली आहे.