मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात वैद्यकीय विभागात विविध पदांसाठी एकूण १४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची, शैक्षणिक पात्रता विविध वैद्यकीय पदांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३८ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट https://www.zpsatara.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.