Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’ लघुपटाचे ३ जानेवारीला थेट प्रक्षेपण

December 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Shantata marathicha court chalu

मुक्तपीठ टीम

आपली मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी  राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे‘, हा लघुपट नविन वर्षाचा पहिल्या सोमवारी दि. ०३ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय थेट प्रक्षेपित करणार आहे. हा लघुपट महासंचालनालयाच्या पुढील  लिंकवरून पाहता येणार आहे.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR     

            

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषा कशी पात्र आहे याचे महत्व अधोरेखित करणारा हा लघुपट मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून  तयार करण्यात आला आहे. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभागाच्या या लघुपटात कोर्टाच्या देखाव्यातून जुन्या जाणत्या  साहित्यिकांना व तज्ज्ञांना बोलावून मराठी भाषेच्या अभिजातपणासंदर्भात त्यांची साक्ष नोंदविण्याचा रंजनात्मक प्रयोग करण्यात आला आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासादरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे नाट्यमय सादरीकरण या लघुपटात करण्यात आले आहे.

 

नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस हा लघुपट दाखविण्यात आला. याचवेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती करणारे पत्र पाठविण्याची मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत सुमारे साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात आली आहेत.

 

नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दि. ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची ओळख व माहिती करून देणारे असे वैशिष्ट्यपूर्ण दालन मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आले होते, तसेच राज्य मराठी विकास संस्थेने निर्मित केलेला शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे हा लघुपटही यावेळी दाखविण्यात आला.

 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सदस्यांसाठी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या लघुपटाचा  विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.


Tags: Akhil Bharatiya Marathi Sahitya SammelannashikShantata marathicha court chaluअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननाशिकशांतता मराठीचं कोर्ट चालू आहे
Previous Post

सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

Next Post

३१ डिसेंबर व नववर्ष स्वागत कार्यक्रमांसंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Next Post
new year celebration rules

३१ डिसेंबर व नववर्ष स्वागत कार्यक्रमांसंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!