मुक्तपीठ टीम
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. असं असताना काँग्रेसने नेहमी निवडणुकांच्या वेळी स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान काँग्रेस आगामी मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले भाई जगताप?
- मुंबई काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
- यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अस्लम शेख, नसीम खान माणिकराव ठाकरे, चरणसिंग सप्रा व इतर कॉंग्रेसी नेते पदाधिकारी उपस्थित होते.
- “मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो २३६जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल.
- काँग्रेसचं गतवैभव परत आणण्याचा आम्ही मुंबईत प्रयत्न करु.
भाई जगतपांचा राज्यपालांना प्रश्न
- आज काँग्रेस १३७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
- सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांमध्ये देशात अशा प्रकारची पद्धत कधीही पाहिली नाही की राज्यपालांकडून अनेक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जातो.
- महाराष्ट्राचे राज्यपाल ज्या पद्धतीने आज वागत आहेत हे योग्य नाही.
- हात दाखवून ओपन मतदान आपण घेऊ शकतो तर मागच्यावेळेस सुद्धा अशीच पद्धत अवलंबली होती मग या वेळेस काय झालं आता अडथळे येत आहेत ?, असा प्रश्न भाई जगताप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला.
- लोकशाहीच्या चौकटीला कोणीही हात लावू नये, येणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असेल अशी खात्री आहे.