मुक्तपीठ टीम
नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, शिपाई पदांच्या एकूण ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
लॅब टेक्निशियनसाठी अर्ज करणारे उमेदवार भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सुक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवीधर असणे आवश्यक. फार्मासिस्टसाठी अर्ज करणारे उमेदवार डी. फार्मा/ बी. फार्मा यामध्ये पदवीधर असणे आवश्यक. कनिष्ठ सहाय्यक अर्ज करणारे उमेदवार किमान ४ थी उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १२ फेब्रुवारी २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षे असावे तसेच मागासवर्गीयांसाठी ०५ वर्षापर्यंत सूट आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी २०० रुपये तर मागासवर्गींयासाठी १०० रुपये शुल्क आकारले आहे.
अधिक माहितीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाइट www.zpnashik.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता. अर्ज ऑफलाईन (प्रत्यक्ष/ पोष्टाने) पद्धतीने करायचा आहे.