मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- तपशील पुढीलप्रमाणे –
- मुंबई -११
- रायगड (पनवेल मनपा) -५
- ठाणे मनपा-४
- नांदेड- २
- नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण – प्रत्येकी १
- यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ८४* |
२ | पिंपरी चिंचवड | १९ |
३ | पुणे ग्रामीण | १७ |
४ | पुणे मनपा, ठाणे मनपा | प्रत्येकी ७ |
५ | सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा | प्रत्येकी ५ |
६ | नागपूर | ३ |
७ | कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नांदेड | प्रत्येकी २ |
८ | बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला, वसई-विरार, नवी मुंबई , मीरा-भायंदर, पालघर, भिवंडी निजामपूर मनपा | प्रत्येकी १ |
एकूण | १६७ | |
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ७२ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या २६ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- वय : १८ वर्षांखालील – ४; ६० वर्षांवरील – २.
- लिंग – १४ पुरुष, १२ स्त्रिया
- प्रवास – २४ जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर २ जण निकटसहवासित.
- लसीकरण – १८ वर्षाखालील ४ जण आणि इतर ३ जण वगळता १९ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
- आजाराचे स्वरुप – २१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ५ जणांना सौम्य लक्षणे आहेत.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२६८८७ | १५७१८५ | १८४०७२ | २६८८७ | ८५८१ | ३५४६८ | १६५ | ६६ | २३१ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७४३ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९८ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या २७ डिसेंबर २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा:
राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!