Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्व काही फिल्मी! भिंतीत नोटा, फरशीत सोने! तोडण्यासाठी मजूर, मोजण्यासाठी मशिन कमी पडल्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
piyush jain house raid

मुक्तपीठ टीम

कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियुष जैन यांच्या घरातून १८१ कोटी सापडल्यानंतर त्यांच्या कन्नौजच्या घराच्या भिंती, फरशी, छत आणि तळघरात करोडो रुपये आणि सोने-चांदी सापडले आहेत. अगदी सिनेमात दाखवतात तसचं त्यांच्या घरी सोनं-चांदी पैसै सापडले आहेत. रविवारी तिसर्‍या दिवशी कन्नौजमध्ये GST इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरल (डीजीजीआय) आणि आयकर विभागाच्या कारवाईत सुमारे ११० कोटी रुपये रोख आणि २७५ किलो सोने आणि चांदी सापडली. सध्या मशिनद्वारे नोटा मोजण्याचे काम सुरू आहे. रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

कर बुडवल्याच्या संशयाखाली, डीजीजीआय पथकांनी बुधवारी कानपूरमधील शिखर पान मसाला, गणपती ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी छापे टाकले. येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी अत्तर व्यापारी पियुष जैन यांचे गुजरात, मुंबईत, कानपूर, कन्नौज येथील घर, कारखाना, कार्यालय, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.कानपूरमध्ये मिळालेल्या रकमेची मोजणी पूर्ण झाल्यानंतर, डीजीजीआय टीमने पियुषनां ताब्यात घेतले आणि कन्नौजच्या येथिल घरावर छापा टाकला. शनिवारी येथे नोटांनी भरलेली आठ पोती जप्त करण्यात आली. तिसर्‍या दिवशी पियुष जैन यांचे चिप्पट्टी येथील वडिलोपार्जित घर, इतर दोन घरे आणि शेजारील गोडाऊनवर छापे टाकण्यात आले. वडिलोपार्जित घराच्या भिंती, फरशी, छत आणि तळघरातून ११० कोटी रुपये रोख, २५० किलो चांदी आणि २५ किलो सोने सापडले आहे.

 

१० ते २००० च्या नोटांचे बंडल सापडले

  • पियुष जैन यांच्या बेडरूममध्ये प्लाय आणि रेक्सिनपासून बनवलेल्या शोपीसच्या भिंतीच्या आतून सर्वात मोठी रक्कम सापडली.
  • याशिवाय पायऱ्यांच्या आतून काही पैसेही सापडले.
  • जप्त करण्यात आलेल्या रुपयांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर आणि दहा-दसाच्या नोटांचा समावेश आहे.
  • गुजरातमधील अहमदाबाद आणि लखनौ येथील दोन पथकांनी तपास प्रक्रियेची माहिती घेतली.

 

आता रक्कम वाढणार

  • भिंती तोडण्यासाठी सुमारे १० मजूर कामावर होते.
  • हे लोक गॅस वेल्डिंग कटर आणि छिन्नी-हातोड्याने भिंती आणि लॉकर तोडण्यात व्यस्त होते.
  • दरवाजे उघडण्यासाठी डुप्लिकेट चाव्या बनवण्यासाठी पाच कारागीर गुंतले आहेत.

 

आतापर्यंतच्या तपासात सापडलेल्या नोटांची मोजणी घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. सोन्या-चांदीच्या वजनासाठी देशी तराजूही आणण्यात आले. आणखी रोकड मिळण्याची शक्यता वर्तवत सोमवारी सकाळपर्यंत तपास सुरू राहणार असल्याचे डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


Previous Post

नवीन वर्ष, नवीन बदल…पण काही बदल नवी महागाई वाढवणारेही!

Next Post

सरोगेसी मातृत्वातील गैरव्यवहारांवर अंकुश! नव्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी!

Next Post
ramnath kkovind

सरोगेसी मातृत्वातील गैरव्यवहारांवर अंकुश! नव्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!