मुक्तपीठ टीम
भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शनिवारी देशाला संबोधित केले.यावेळी त्यांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाविरोधात लढा देणारे फ्रंट वर्कर म्हणजेच कोरोना योद्ध्यांनाही बुस्टर डोस देण्यात येणार आहे असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
देशवासियांना संबोधीत करताना पंतरप्रधान मोदी म्हणाले, “भारताने यावर्षी १६ जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. तो एक सामूहिक प्रयत्न होता. याचा परिणाम म्हणून आज देशात १४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. आपण १४१ कोटी लसींचे मोठे लक्ष्य पार केले आहे. लसीकरणाबाबत आपण सातत्याने काम केले आहे. आपण जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आज भारतातील ६१ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे ९० टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा एकच डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कॉ-मॉरबिडिटी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीच्या Precaution Dose चा पर्याय उपलब्ध होईल. हे लसीकरण देखील १० जानेवारीपासून उपलब्ध होईल”.
मोदींच्या घोषणा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला संबोधित करताना त्यांनी कोरोना संसर्गापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. - ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची घोषणा केली होती, तर १० जानेवारीला आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती, ६० वर्षांवरील व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची घोषणा केली.
पंतप्रधानांनी मांडलेले मुख्य मुद्दे-
- कोरोनाविरुद्धच्या लढाईत हात धुण्याची आणि मास्क लावण्याची सवय वाढत आहे.
- देशात १८ लाख आयसोलेशन बेड, पाच लाख ऑक्सिजन बेड, १,४०,००० ICU बेड आहेत.
- मुलांसाठी बी आयसीयू आणि नॉन आयसीयू बेड आहेत.
- देशात ३,००० हून अधिक PSA ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत, देशभरात चार लाख ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत.
- आवश्यक औषधांच्या बफर डोससाठी राज्यांना मदत करण्यात आली आहे.
- राज्यांना पुरेशा चाचणी किटसाठीही मदत केली जात आहे.