मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेच्या प्रिता या तिकीट चेकिंग स्टाफमुळे खारघर स्थानकात सापडलेली अनाथ बालिका सुखरूपपणे ‘चाईल्ड केअर’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या सिल्वा यांनी
आपले नेहमीचे तिकीट चेकिंगचं कार्य करून घरी गेल्या. त्यांचे निवासस्थान खारघर रेल्वे स्थानकाजवळ आहे. त्या घरी पोचत नाही तोच, रात्री ८ वा. त्यांना खारघर रेल्वे स्थानकातील अनाऊन्सरकडून तातडीचा फोन आला. खारघर स्टेशनवर
एक अल्पवयीन मुलगी रडत असताना सापडली आहे. त्या मुलीला कोणाकडे सोपवावे याचा प्रश्न संबंधीताना सतावत होत होता. मात्र सिल्वा यांनी क्षणाचाही वेळ न दडवता त्यांना सांगितलं,’मुलीला कोणाकडेही सोपवू नका. मी त्वरित स्टेशनवर येतेयं.तिने स्टेशनवर येऊन त्या मुलीशी संवाद साधला.तिला बोलते केले. तिला धीर दिला.
सिल्वा यांचे महत्वाचे शब्द ऐकुन त्या बालिकेने अत्यंत हृदयद्रावक कहाणी त्यांना सांगितली. वाईट परिस्थितिचा त्या मुलीने सामना केला होता. वयाच्या ६ व्या वर्षी तिच्या आईने-भावाने तिला अनाथ आश्रमात ठेवले होते. तिथल्या जाचाला कंटाळून अखेर तिने तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि खारघर रेल्वे स्थानकात पोहचली. बाहेरच्या जगाशी गेली कित्येक वर्ष संबंध आल्या नसल्याकारणाने,ती गांगरून गेली आणि रडत असताना अनाऊन्सरच्या नजरेस पडली. त्या अनाऊन्सरचेही मन द्रवले. प्रिता सिल्वा आणि अनाऊन्सर यांच्यातील माणुसकी जागी झाली. आणि त्यानंतर अनेक ठिकाणी संपर्क साधून चाईल्ड केअर संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. एका संस्थाने या बालिकेला स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
मात्र संस्थेच्या पदाधिकारीना बोलविताना, “त्यांच्या सोबत एक महिला सहायक असलाचं पाहिजे. अन्यथा तिला तुमच्याकडे सोपविले जाणार नाही, असे ठणकावून सांगितले. पदाधिकाऱ्यांनीही सिल्व्हा यांची अट मान्य केली.
सिल्वा यांच्या ठाम भूमिकेमुळे ती अल्पवयीन मुलगी “चाईल्ड केअर” संस्थेत दाखल झाली. चाईल्ड केअरचे पदाधिकारी घटनास्थळी येणे , तिची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करणे व इतर सोपस्कार करण्यासाठी रात्रीचे ११.३० वाजले. ” या समाजात मी जन्म घेतला आहे. या समाजाचं मी काही तरी देणं लागते..असे सिल्वा म्हणाल्या. ‘ ही भावना रुजविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. हे आम्ही अभिमानाने म्हणू शकतो . सिल्वा सुद्धा याला अपवाद नाही. अनाऊन्सरच्या फोनला त्यांनी दिलेला त्वरित प्रतिसाद आणि जातीने उपस्थित राहून, सगळे कार्य व्यवस्थित करून एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचविण्याचं मोठं कार्य सिल्वा यांनी केले आहे. तिच्या कार्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई “तिकीट चेकिंग परीवार” चे ज्येष्ठ पदाधिकारी डी. बी. चिंदरकर , हरीश मोंडकर यांनी “मुक्तपीठ” कडे व्यक्त केली. “सिल्वा यांचे मनःपूर्वक अभिनंदन, पदाधिकाऱ्यांची त्या बालिकेप्रती जागरूकता, सजगता व सामाजिक बांधिलकीला आम्ही सर्व “तिकीट चेकिंग परीवार” सलाम करतो, असे चिंदरकर म्हणाले.