मुक्तपीठ टीम
म्हाडा पेपर फुटी प्रकरणाचा शोध सुरु असताना पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षा गैरप्रकारात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना गुरुवारी चौकशीला बोलावले होते. तुकाराम सुपे यांच्या पुढाकाने आर्थिक गैरव्यावहार करुन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. असा आरोप सुपेंवर करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी – चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं सापडली होती.
- पोलिसांकडून प्रीतेश देशमुखची चौकशी करण्यात आली.
- या चौकशीमध्ये असे आढळले की, २०२० मध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती.
- त्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यावहार झाला होता.
- तो व्यवहार तुकाराम सुपे यांच्या पुढाकाराने झाला होता.
- गुरुवारी सकाळपासून तुकाराम सुपेंना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
- अखेर पुणे पोलिसांनी सुपे यांना अटक केली आहे.
सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे..
राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक होणे ही निंदनीय बाब
- राज्यातील २०२० च्या शिक्षक पात्रता परीक्षेत जे उमेदवार ठरले होते त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवले आणि त्यांना नोकरीत घेतलं अशा प्रकारची गोष्ट पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली होती.
- त्यामुळे तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलं आहे.
- पुणे पोलीस गुरुवारपासून तुकाराम सुपे यांची चौकशी करत होते.
- दरम्यान शुक्रवारी सकाळी तुकाराम सुपे यांना अटक केले.
- दुपारी सुपे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाच्या अध्यक्षांना अटक होणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे.
जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे नेमकं काम काय?
- जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती.
- पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे.