Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीचे पिता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मस्तवालपणा! आता पत्रकारांवर संतापले, शिवीगाळ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajay mishra abuse journalist

मुक्तपीठ टीम

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रावर गुन्हा दाखल असून सध्या तो तुरुंगात आहे. दरम्यान अजय मिश्रा टेनी यांचे एक विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गृह राज्यमंत्री अजय टेनी पत्रकाराची कॉलर पकडून, अपशब्द वापरताना दिसत आहे. यामुळे अजित मिश्रा टेनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अजय मिश्रा यांना मुलगा आशिष मिश्राबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकाराची कॉलर पकडली आणि शिविगाळ केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक टेनीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

 

व्हिडिओ शेअर करताना ज्येष्ठ पत्रकार उमाशंकर सिंह यांनी ट्विट केले आणि लिहिले, ‘लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी प्रश्न विचारल्याने संतापले होते. पत्रकाराला धमकी दिली. त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, पुढचा व्हिडिओ आणखी भयावह आहे. पत्रकाराचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करतात, धमक्या देतात.

 

लखीमपुर खीरी मामले के मुख्य अभियुक्त के पिता और गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी सवाल पूछने पर भड़के। पत्रकार को धमकाया… pic.twitter.com/gBXelPSf8o

— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) December 15, 2021

व्हिडिओ शेअर करताना, कवी कुमार विश्वास यांनी ट्विट केले की, ‘देशातील लोकशाही, लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व आणि अभय रामराज्यासाठी गृह राज्यमंत्री यांची नम्रता, सार्वजनिक धमक आणि उद्दामपणा निःसंशयपणे निषेधार्ह आहे, परंतु मीडियाचे मित्र हल्ला झाल्यावरच प्रश्न उपस्थित करणार का?

 

राहुल गांधी काय म्हणाले?

  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अजय मिश्रा टेनी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
  • मोदी सरकारला गृहराज्यमंत्र्यांना हटवावे लागेल, असे ते म्हणाले.
  • आणि त्यांना तुरुंगात जावे लागेल, मग ते ५ वर्षे, १० वर्षे किंवा १५ वर्षे असो.
  • लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी एसआयटी टीमने अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाविरुद्ध हत्येचा कट रचणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Tags: Ajay mishrajournalistlakhimpur kheriअजय मिश्रा टेनीपत्रकारराहुल गांधीलखीमपूर खेरी हिंसाचार
Previous Post

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत विविध पदांसाठी भरती

Next Post

 भारताचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवस! पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, बांग्लादेश निर्माण केला!

Next Post
Vijay Diwas

 भारताचा सुवर्ण महोत्सवी विजय दिवस! पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, बांग्लादेश निर्माण केला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!