मुक्तपीठ टीम
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई शाखेने शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत. १० डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत एकूण २.२९६ किलो अॅम्फेटामाइन, ३.९०६ किलो अफू आणि २.५२५ किलो झोल्पीडेमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यादरम्यान एका इव्होरियन नागरिकालाही अटक करण्यात आली.
१० डिसेंबर रोजी अंधेरीतील पहिल्या कारवाईत स्टेथोस्कोपमध्ये लपवून ठेवलेले ४९० ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते. दुसऱ्या कारवाईत, १३ डिसेंबर रोजी अंधेरी येथे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवलेले ३.९०६ किलो अफू जप्त करण्यात आले. तिसऱ्या कारवाईत १३ डिसेंबर रोजी अंधेरी येथे २.५२५ किलो झोल्पीडेम गोळ्या जप्त करण्यात आल्या.
१३ डिसेंबर रोजी अंधेरी येथे चौथ्या कारवाईत सायकलिंग हेल्मेट आणि बांगड्यांमध्ये लपवून ठेवलेले ९४१ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. याशिवाय डोंगरी येथे ५व्या कारवाईत होज पाईप आणि टाय बॉक्समध्ये लपवून ठेवलेले ८४८ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. सहाव्या कारवाईत, अंधेरी येथे १४ डिसेंबर रोजी १ टीबी हार्ड डिस्कमध्ये लपवलेले १७ ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले.