मुक्तपीठ टीम
सी-डॅकच्या मुंबई केंद्रात १०० जागांसाठी भरती आहे. मुंबईमधील सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंडिनिअर डेव्हलपर, प्रोजेक्ट इंजिनिअर सिनियर डेव्हलपर, प्रोजेक्ट टेक्निशियन ज्युनियर डेव्हलपर या पदांवर भरती आहे. ही भरती १०० जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनिअर डेव्हलपरसाठी अर्ज करणारे उमेदवार हे प्रथम श्रेणी बी.ई/ बी टेक. कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ आयटी तसेच एमसीए किंवा प्रथम श्रेणी एमएससी.कॉम्प्युटर सायन्स / आयटी किंवा एमसीएस + ०१ वर्षाचा अनुभव. प्रोजेक्ट इंजिनिअर सिनियर डेव्हलपरसाठी अर्ज करणारा उमेदवार हा प्रथम श्रेणी बी.ई. / बी.टेक. कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अॅप्लिकेशन / आयटी तसेच एमसीए किंवा एमई / एम टेक किंवा प्रथम श्रेणी एम. एससी. कॉम्पुटर सायन्स / आयटी किंवा एमसीएस + ०१ वर्ष अनुभव. प्रोजेक्ट टेक्निशियन ज्युनियर डेव्हलपरसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रथम श्रेणी कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/ आयटी पदवी तसेच ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्रमांक ०१ आणि ०२ साठी उमेदवारांचे कमाल वय हे ३७ वर्षापर्यंत, पद क्रमांक ०३ साठी उमेदवाराचे कमाल वय हे ३० वर्षापर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी सीडैकच्या अधिकृत वेबसाइट www.cdac.in वरून माहिती मिळवू शकता.