मुक्तपीठ टीम
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या चाळीसगाव – धुळे मेमू ट्रेन सेवेला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
मा. रेल, कोयला एवं खान राज्यमंत्री श्री @raosahebdanve जी ने आज चालीसगांव-धुले मेमू ट्रेन सेवा का वीडियो कांफ्रेंसिंग के माध्यम से हरी झंडी दिखाकर शुभारंभ किया. मा. प्रधान मंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में रेल मंत्रालय सदैव यात्री सुविधाओं के लिए कार्य करता रहा है। pic.twitter.com/wBN3TbjYEy
— Office of Raosaheb Patil Danve (@raosaheboffice) December 13, 2021
याप्रसंगी संबोधित करताना रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे सर्व प्रवासी सेवा ठप्प झाल्या असल्या तरी मालवाहतूक आणि पार्सल गाड्या चालवून देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी केवळ रेल्वेनेच राखली. ते पुढे म्हणाले की, रेल्वेने स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना हाती घेतली असून लवकरच प्रवाशांना विमानतळांप्रमाणेच रेल्वे स्थानकांवरही सुविधा मिळतील.
“स्थानिक नागरिकांचे हित व मागणी लक्षात घेता सर्वांच्या उपस्थितीत आज चाळीसगाव ते धुळे दरम्यान मेमू सेवा सुरु करण्यात आली आहे. मेमू ट्रेन ही उपनगरीय ट्रेनसारखीच आहे, तिला वेगळे इंजिन लावण्याची गरज नाही, त्यामुळे वेळेची खूप बचत होते आहे.
स्थानीय लोगों के हितों और मांगों को ध्यान में रखते हुए आज से चालीसगांव से धुले के बीच मेमू सेवा शुरू की गई है। मेमू ट्रेन उपनगरीय ट्रेन के समान है, इसमें अलग इंजन की आवश्यकता नहीं होती है, इसलिए यह बहुत समय बचाता है। इस मार्ग पर कई सबवे और फ्लाईओवर का निर्माण भी किया गया है। pic.twitter.com/YRbHkl46Fo
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) December 13, 2021
याचबरोबर अनेक सबवे आणि उड्डाण पुलांची देखिल निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या संचालनात सुधारणा तर झालीच आहे तसेच नागरिकांच्या वेळेची बचत देखील होत आहे. ह्या ट्रेन चा उपयोग चाळीसगाव, भोरस, जामधा, राजमाने, मोरदाडतांडा, शिरुड, बोरविहीर, मोहाडी व धुळे या ठिकाणांवरील लोकांना होणार आहे.”असे दानवे म्हणाले.
मंत्री पुढे म्हणाले की २०२३ पर्यंत भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे आपले पर्यावरण प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल राखण्यास मदत होईल. या मेमू सेवेचे उद्घाटन करताना मला खूप आनंद झाला. लहान शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी या सेवेची गरज आहे, कारण इतर वाहतुकीच्या तुलनेत हे सर्वात स्वस्त साधन आहे.
धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. खासदार डॉ. सुभाष भामरे आणि खासदार उन्मेष पाटील, नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्र्यांसह उपस्थित होते.