मुक्तपीठ टीम
जीवाचा धोका असतो तरीही बेफाम वेगाने किंवा राँगवेने गाडी चालवणे अनेकांना बेफाम आवडते. आता मुंबई पोलीस अशाच भन्नाट वेगाची नशा करणाऱ्यांविरोधात थेट गजाआड पाठवण्याची कारवाई करणार आहेत. त्यामुळे कुणीही नियम मोडून तसेच सुटणार नाही. पोलीस थेट अशांचा माग काढतील. मुंबई ट्रॅफिक पोलीस अशांना शोधून काढतील आणि सहा महिन्यासाठी कारावास होईल अशी आरोपाखाली न्यायालयात हजर करतील.
आतापर्यंत १५५ वाहन चालकांवर वेगाने आणि राँगवेने गाडी चालवण्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आता ट्रॅफिक पोलीस कायद्याचे पालन न करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. त्यासाठी गेल्या महिन्याभरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करीत आहेत. मात्र, नियम मोडणाऱ्यांच्या घरी जावून त्यांच्याविरोधात कारवाई सुरु करण्याची योजना आखत आहेत.
सहआयुक्त, वाहतूक अधिकारी यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वेगाने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालविल्यामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्यावर होणाऱ्या या गैरप्रकाराला सहन केले जाणार नाही. ट्रॅफिक पोलिसांची टीम सीसीटीव्ही फुटेज पाहून वेगाने किंवा राँगवेने ड्रायव्हिंग करताना सापडलेल्या वाहनांची नोंद केली जाईल. वाहनांची नंबर प्लेट्स पाहून, त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील मिळवला जाईल. त्या ठोस पुऱ्याव्यांसोबत नियम मोडणाऱ्यांच्या घरी भेट देणार. त्यांच्याविरोधात सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठाठोवता येईल, अशी कारवाई सुरु करणार.”
बेफाम चालक, तुफान कारवाई
• या महिन्यात राँगवेने गाडी चालवणाऱ्या १५५ गुन्हेगारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
• पोलिसांनी आयसीसीच्या कलम २७९ बेफाम वेगाने गाडी चालवणाऱ्यांसाठी लागू केला आहे.
• १५५ गुन्हेगारांपैकी ७८ टक्के हे मोटारसायकलस्वार आहेत
• वांद्रे विभागात ५६ सर्वाधिक प्रकरणे आढळली होती.
• दंड न भरलेल्या वाहनचालकांच्या मागावर वाहतूक पोलीस जात आहेत
• वारंवार आठवण करूनही ४,२०० वाहन चालकांनी दंड भरलेला नाही.
• आरटीओने अशा लोकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
• जेणे करून त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर बंदी घालण्यात येईल.
पाहा व्हिडीओ: