Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांचा आजसाठी आधीच रेकॉर्ड केलेला ‘तो’ व्हिडीओ संदेश…

December 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Bipin Rawat

मुक्तपीठ टीम

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत १२ डिसेंबर रोजी इंडिया गेट येथे होणाऱ्या विजय पर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या विशेष महोत्सवाची त्यांची तयारीही विशेष म्हणावी अशीच होती. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ते संपूर्ण देशाला आवाहन करणार होते. त्यासाठी जनरल रावत यांनी व्हिडीओ संदेशही रेकॉर्ड केला होता. आज ते आपल्यात असते तर त्यांनी जनतेला संबोधित करत आपला संदेश दिला असता.

 

Tiger’s Last Public Message !
General Bipin Rawat’s this message was recorded the evening before the helicopter crash. It was to be telecasted/played today morning as part of the 1971 War Vijay Diwas Event. pic.twitter.com/ctlP20eT3i

— Major Surendra Poonia (@MajorPoonia) December 12, 2021

 

विजय पर्वसाठी रेकॉर्ड केलेला सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा व्हिडीओ संदेश

  • सुवर्ण विजय पर्वानिमित्त, मी भारतीय सैन्यातील सर्व शूर सैनिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.
  • १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याच्या विजयाचा ५०वा वर्धापन दिन आम्ही विजयपर्व म्हणून साजरा करत आहोत.
  • या पवित्र दिनाच्या दिवशी सशस्त्र दलातील शूर जवानांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला मी आदरांजली अर्पण करतो.
  • १२ ते १४ डिसेंबर दरम्यान इंडिया गेट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  • अमर जवान ज्योतीच्या छायेत विजय पर्व आयोजित केले जात आहे ही भाग्याची गोष्ट आहे.
  • ज्याची स्थापना आपल्या शूर शहीदांच्या स्मरणार्थ करण्यात आली.
  • या विजयोत्सवाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही देशातील सर्व नागरिकांना आमंत्रित करतो.
  • आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे.
  • चला एकत्र विजय साजरा करूया. जय हिंद!

 

राजनाथ सिंह जनरल बिपिन रावत यांच्या स्मर्णार्थ

इंडिया गेटवर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ‘सुवर्ण विजय वर्ष’ निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “हा कार्यक्रम अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे जाणे अकाली झाले. त्यांच्या मृत्यूनंतर विजय पर्व साधेपणाने साजरे करायचे ठरवले आहे. त्यानिमित्त मी त्यांना स्मरण करून आदरांजली वाहतो.

 

#VijayParv #VijayParv celebrations were inaugurated by the #RakshaMantri Shri Rajnath Singh at #IndiaGate Lawns today. To commemorate the golden jubilee of #1971War victory, the celebrations would be conducted over two days at #NewDelhi from 12 to 13 Dec 21. pic.twitter.com/KsncWRe7Ok

— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) December 12, 2021

 

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ‘सुवर्ण विजय वर्ष’ अंतर्गत आयोजित ‘विजय पर्व’ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण इंडिया गेट येथे जमलो आहोत, असे ते म्हणाले. हा सण भारतीय सैन्याच्या गौरवशाली विजयाचे स्मरण करतो, ज्याने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विधानाची कदाचित तुम्हा सर्वांना माहिती असेल, ज्यात त्यांनी ‘कुठेही अन्याय हा सर्वत्र न्यायाला धोका आहे’ असे म्हटले होते.

 

या दिवशी मी भारतीय लष्कराच्या प्रत्येक जवानाच्या शौर्य, बलिदानाला नमन करतो, ज्यामुळे भारताने १९७१ चे युद्ध जिंकले होते. त्या सर्व वीरांच्या त्याग आणि बलिदानाचा हा देश सदैव ऋणी राहील.

 

ते म्हणाले की, “या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य जनता १९७१ च्या युद्धातील यश आणि प्रेरणांशी स्वत:ला जोडू शकतील आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या पद्धतीने आत्मसात करू शकतील, अशी मला केवळ आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे.”

 

संरक्षण मंत्री म्हणाले की, “मला आनंद होत आहे की या महोत्सवात देशातील सामान्य जनतेला सहभागी करून घेण्यासाठी, त्यांना १९७१ च्या युद्धाची माहिती देण्यासाठी, आपल्या सैन्याच्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमचे सशस्त्र दल कोणत्याही प्रसंगासाठी सज्ज ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. ‘विजय पर्व’ सारखे उत्सव आपल्याला या मार्गावर वेगाने वाटचाल करण्याची प्रेरणा देतात.”


Tags: Bipin Rawatबिपिन रावतविजय पर्व
Previous Post

“लोकशाही, संविधानावर आघात करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे”

Next Post

सौदी अरेबियाची तबलिगी जमातवर बंदी! सौदी म्हणते तबलिगी जमात म्हणजे दहशतवादाचे प्रवेशद्वार!!

Next Post
saudi government

सौदी अरेबियाची तबलिगी जमातवर बंदी! सौदी म्हणते तबलिगी जमात म्हणजे दहशतवादाचे प्रवेशद्वार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!