रॉबिन डेव्हिडसन
आपल्या राज्यातील अनेक भागांमध्ये आजही लोडशेडिंगची समस्या सतावते. आता मात्र किमान सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंधरा शाळांमध्ये ही समस्या सतवणार नाही. त्याचं कारण आहे सौरशक्ती.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या १५ शाळांमध्ये roof top solar units बसविण्यात येणार आहेत. या सौर युनिट्सचे काम net metering प्रणालीद्वारे चालणार आहे. या कामासाठीच्या निविदेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 6 शाळांमध्ये 1 किलो वॅट क्षमतेचे, 8 शाळांमध्ये 2 किलो वॅट क्षमतेचे तर एका शाळेमध्ये 3 किलो वॅट क्षमतेचे सौर संयंत्र बसविण्यात येणार आहे. यामुळे दैनंदिन एकूण 26 किलो वॅट वीज शाळांना उपलब्ध होऊन शाळांवरील वीज बिलाचा आर्थिक भारही कमी होणार आहे.
माझी वसुंधरा अभियानातून पर्यावरण पूरक शाळा व प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण रक्षण या संकल्पना राबविण्याचा मनपाचा मानस आहे. याचसोबत मनपाच्या उर्वरित शाळाही टप्प्याटप्प्याने roof top solar units ने जोडण्यात येणार आहेत.
Roof top solar units बसविण्यात येणाऱ्या शाळा खालीलप्रमाणे आहेत.
- शाळा क्र. ०९, सांगलीवाडी.
- शाळा क्र. १४, वखारभाग, सांगली.
- शाळा क्र. २७, सांगली.
- शाळा क्र. ३४, सांगली.
- शाळा क्र. ४२, सांगली.
- शाळा क्र. ०४, मिरज.
- शाळा क्र. ०८, मिरज.
- शाळा क्र. ०९, मिरज.
- शाळा क्र. १०, मिरज.
- शाळा क्र. ११, मिरज.
- शाळा क्र. १२, मिरज.
- शाळा क्र. १६, मिरज.
- शाळा क्र. १७, मिरज.
- शाळा क्र. २०, मिरज.
- शाळा क्र. २५, मिरज.