मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसीच्या प्रशिक्षण शिबिरात खंड पडला होता. आता अनलॉकनंतर एनसीसी शिबिराचे विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करत आयोजित या शिबिरास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
अखेर एनसीसीने ‘डीजीएनसीसी’च्या आदेशानुसार कोविड नियमांचे पालन करून विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. सदर शिबीर १३ डिसेंबर असा आहे. मुंबई विभागात येणाऱ्या महाविद्यालयातील २८० विद्यार्थिनीनी या शिबिरात घेतला. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘८ महाराष्ट्र बटालियन’ कमान अधिकारी कर्नल ऐम. ऐल. शर्मा यांनी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.
सदर शिबीर ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षेसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना लष्कर भरती तसेच सरकारी नोकरभरती परीक्षांसाठी उपयुक्त ठरते, अशी माहिती कमान अधिकारी कर्नल ऐम. ऐल. शर्मा यांनी दिली.