Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

त्रासमुक्त, रांगमुक्त आणि सोयीस्कर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी एअर सुविधा पोर्टल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
air suvidha portal

मुक्तपीठ टीम

एअर सुविधा हा सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्रासमुक्त, रांगमुक्त आणि सोयीस्कर विमान प्रवास प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. ऑगस्ट २०२० पासून १ कोटीहून अधिक प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलचा लाभ झाला आहे. भारतात येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा प्रवास सुविहित व्हावा यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एअर सुविधा पोर्टलवर स्वतःची माहिती संपर्करहित पद्धतीने जाहीर करणे अनिवार्य केले आहे.

 

भारतात आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन सुलभ करण्यासाठी एअर सुविधा हे अशाप्रकारचे पहिलेच डिजिटल पोर्टल आहे. सध्या, हे राज्य अधिकाऱ्यांना संपर्कांचा माग घेण्यासाठी मदत करते. भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना त्रासमुक्त, रांगमुक्त आणि सोयीस्कर हवाई प्रवास प्रदान करणे हा एअर सुविधाच्या अंमलबजावणीचा हेतू आहे. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी नवीन प्रवास मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यापासून १ डिसेंबर २०२१ ते ०५ डिसेंबर २०२१ या काळात एअर सुविधा पोर्टलने २,५१,२१० प्रवाशांना सहाय्य केले आहे. शिवाय, २० ऑगस्ट २०२० मध्ये सुरू झाल्यापासून १ कोटींहून अधिक प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलचा फायदा झाला आहे.

 

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारा विरोधातील आवश्यक उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी, एअर सुविधा पोर्टलवर माहिती भरण्यापासून सूट देणारा अर्ज बंद करण्यात आला आहे, आणि भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हा तपशील भरणे अनिवार्य केले आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह एअर सुविधा पोर्टलवर त्यांची सद्य आरोग्य स्थिती घोषित करणे बंधनकारक आहे.

 

प्रवासी आणि आरोग्य/राज्य अधिकार्‍यांसाठी एअर सुविधा अधिक अनुकूल बनवण्यासाठीचे अपडेट्स

  • ‘जोखीम असलेल्या’ देशांमधील सर्व अर्ज एच आणि लाल बँडने चिन्हांकित आहेत आणि इतर अर्ज हिरव्या रंगात आहेत.
  • ‘जोखीम असलेल्या’ देशांमधील ‘ अर्ज अधोरेखित करण्यासाठी गेल्या १४ दिवसांत भेट दिलेल्या देशांची माहिती विचारली जाते.
  • ड्रॉप-डाउन सूची प्रदान करून फील्डचे मानकीकरण उदा. पत्त्यासाठी जिल्हा आणि राज्य.
  • पोर्टलच्या सुरूवातीला अद्ययावत FAQ सूची आणि ग्राहक सेवा लिंकसह नवीनतम सल्लागार उपलब्ध करणे.
  • ‘जोखीम असलेल्या’देशांसाठी प्रवाशांना त्यांच्या आगमन चाचणीसाठी पूर्वनोंदणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि एसडीएफ सादर करताना प्रवाशांना संबंधित चाचणी सुविधेची लिंक दिली जाते.

 

सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना जोखीम असलेल्या देशांमधून येताना/परिगमन करताना खालील उपायांचे पालन करणे बंधनकारक आहे

  • एअर सुविधा पोर्टलवर स्व-घोषणा अर्ज भरा.
  • निगेटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल अपलोड करा.
  • विमानतळावर आगमनानंतरची कोरोना चाचणी (स्वखर्चाने)
  • ७ दिवसांसाठी गृह विलगीकरण
  • ८व्या दिवशी पुन्हा चाचणी आणि निगेटिव्ह असल्यास, पुढील ७ दिवसांसाठी स्व-आरोग्य निरीक्षण

 

अशा देशांची यादी जिथून प्रवाशांना भारतात आगमन झाल्यावर अतिरिक्त उपायांचे पालन करावे लागेल, ज्यात आगमनोत्तर चाचणी (जोखीम असलेले देश) (६ डिसेंबर २०२१ रोजी अपडेट)

  • युनायटेड किंगडमसह युरोपमधील देश
  • दक्षिण आफ्रिका
  • ब्राझील
  • बोत्सवाना
  • चीन
  •  घाना
  • मॉरिशस
  • न्यूझीलंड
  • झिम्बाब्वे
  •  सिंगापूर
  • टांझानिया
  • हाँगकाँग
  •  इस्रायल

 

एअर सुविधा पोर्टल लिंक: https://www.newdelhiairport.in/airsuvidha/apho-registration

अधिक तपशीलांसाठी, भेट द्या: https://bit.ly/NewTravelGuidelinesOct2021


Tags: Air facilityair suvidha portalDigital portalIndiaInternational air travelmuktpeethsuvidha portalआंतरराष्ट्रीय विमान प्रवासएअर सुविधा पोर्टलडिजिटल पोर्टलभारतमुक्तपीठ
Previous Post

भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि ओशन ब्लिस या टगबोटीच्या टीमना असामान्य सागरी शौर्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Next Post

डिरेक्टरेट जनरल डिफेंस इस्टेटमध्ये ९७ जागांसाठी सरकारी सेवेची संधी

Next Post
dgde

डिरेक्टरेट जनरल डिफेंस इस्टेटमध्ये ९७ जागांसाठी सरकारी सेवेची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!