मुक्तपीठ टीम
क्षेपणास्त्र नौका ही सिंहासारखी असते. ती भक्ष्य येण्याच्या वेळेची वाट पाहात नाही, असे निवृत्त क्षेपणास्त्र नौकेवरील अधिकारी एम. प्रसाद यांनी मुक्तपीठला सांगितले. युद्ध सुरु असताना खाणे-पिणे याचा विचारही मनाला शिवत नाही. तरीही खुष होतो. भारतीय नौकेत ड्युटी करत असताना शत्रुच्या नौकेवर हल्ला करण्याचा आमचा कोणताही प्लॅन नव्हता. मात्र शत्रुची नौका दिसल्यानंतर तिच्यावर जोरदार हल्ला (हिट हार्ड) करावाच लागतो. कारण क्षेपणास्त्र नौका (मिसाईल बोट) ही सिंहासारखी आहे. कारण सिंह कधीच आपल्या सावजाला सावध करुन शिकार करत नाही. त्यामुळे मार्गदर्शक क्षेपणास्त्र (गायडेड मिसाईल) शत्रुच्या लहान किंवा मोठ्या नौकेवर डागण्याची वेळ पाहायची नाही., असे माझा अनुभव आणि पक्की खात्री आहे, अशी माहिती एम. प्रसाद यांनी दिली. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ते ठाण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांनी कर्जतला चॅरिटेबल शाळा सुरु केली आहे.