मुक्तपीठ टीम
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ आता भारतीय नौदलाला दुध पुरवठा करणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध नौदलाला पुरवठा करण्यासाठी करार झालेला आहे. उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक गोकुळचे नवं उत्पादन आहे. हे टेट्रापॅक दुध सामान्य तापमानात १८० दिवस खराब होत नाही. २२ हजार लिटर दुधाची पहिली फेरी कर्नाटकच्या कारवारला रवाना झाली आहे.
या दुधाची वैशिष्ट्य काय आहेत?
- भारतीय नौदलातील जवानांना आता सहज दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
- उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक दुधाची निर्मिती करण्यात आली आहे.
- या दुधाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे हे दूध सामान्य तापमानामध्ये १८० दिवस चांगले राहाते.
- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे टेट्रापॅक हे नवीन उत्पादन आहे.
- हे दूध दीर्घकाळ चांगले राहात असल्य़ामुळे नौदलाला दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन लाख ६७ हजार लीटर दूध पुरवठ्याचा गोकुळसोबत करार
- तब्बल २ लाख ६७ हजार लीटर दूध पुरवठ्याचा गोकुळसोबत करार करण्यात आला आहे.
- या करारानुसार पहिली दुधाची खेप शुक्रवारी रवाना झाली.
- टेट्रापॅक दूध दीर्घकाळ टिकणारे आहे.
- सामान्य तापमानाला १८० दिवस चांगले राहु शकते. यामुळे जवानांना वेळेत दूध मिळेल, याचा संपूर्ण गोकुळ परिवाराला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे.
- तसेच गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक, वितरक आणि हितचिंतकाचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.