मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या दोन जांगावर मतदान सुरु आहे. नागपूर आणि अकोला-बुलडाणा -वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नागपूरमध्ये या निवडणुकीत एक भलतंच वळण आलं आहे, काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. भाजपातून आलेले छोटू भोयर यांची उनेदवारी बदलून ती ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने समर्थन दिलं आहे.तर भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिथं वंचितच्या भूमिकेवर निकालाचा तराजू दोलायमान आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसचा बदलाचा झटका
- नागपूरमध्ये काँगेसने भाजपा नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी उमेदवार बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले.
- भाजपनं विधानसभेत तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे.
- मतदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून कमालीची सतर्कता बाळगली होती.
- मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला.
भाजपामधून आलेले छोटू भोयर यांची प्रतिक्रिया
- निवडणूक लढवण्यासाठी मी असमर्थता दर्शवली नाही.
- काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात मात्र मी असमर्थता दर्शवली असल्याचं म्हटलंय.
- पण जर काँग्रेसला वाटत असेल की ही निवडणूक छोटू भोयर यांच्या नावावर जिंकू शकत नाही.
- त्यामुळे जर त्यांनी उमेदवार बदलला असेल तर मी त्या निर्णयाचा स्वीकार करतो.
- मंगेश देशमुख यांच्या विजयासाठी मी जे जे करु शकतो ते करणार आहे.
- मात्र, पक्षानं असं का केलं याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यावरच सांगेन.
अकोला बुलडाणा
- अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे.
- अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
- या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा कौल ठरवणार आहेत.
एकूण कोणाकडे किती मते?
- या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस १९०, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ७६ असे एकूण ३९६ मते आहेत.
- भाजपाकडे २४४ मते आहेत.
- दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
- या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे ८५ तर अपक्ष १७२ असे एकूण २५६ मतदार आहेत.