मुक्तपीठ टीम
नवीन वर्षातील दुसरा महिना आजपासुन सुरू झाला आहे. या महिन्यात बरंच काही महत्वाचं घडणार आहे. या महिन्यातील अशा काही महत्वाच्या दिवसांची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील पाच कोणते महत्वाचे दिवस सर्वांसाठी महत्वाचे आहेत, त्यावर एक नजर टाकूया.
१ फेब्रुवारी
• देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे.
• तब्बल १० महिन्यानंतर मुंबईची जीवनवाहिनी ‘लोकल सेवा’ सर्वांसाठी सुरु झाली आहे.
• केंद्र सरकारने चित्रपटगृहांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षकांना चित्रपट पाहाणाच्या मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अद्याप धोरण जाहीर झालेले नाही.
• स्विमिंगपूलचा वापर करण्यासाठी सर्वांना परवानगी दिली आहे.
• रेल्वे कोरोना संकटात बंद केलेली आपली खान-पान सेवा पुन्हा सुरू करणार आहे. प्रवासी ecatering.irctc.co.in या वेबसाइटवर खाद्यपदार्थांची प्रवासासाठी मागणी नोंदवू शकतात.
२ फेब्रुवारी
• सीबीएसईच्या १० वी, १२ वी विद्यार्थांच्या परिक्षेबद्दल जाहीर होईल. परिक्षा ४ मे ते १० जूनपर्यंत चालणार आहे.
५ फेब्रुवारी
• कोरोना संकटात भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंदच होते. आता १० महिन्यानंतर ५ फेब्रुवारीला देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये हा कसोटी सामना होईल.
• चेन्नईमध्ये दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीला खेळला जाणार.
१५ फेब्रुवारी
• देशभरातील सर्व नॅशनल हायवेच्या टोल नाक्यावर चारचाकी वाहनांवर फास्टॅग असणे बंधनकारक असेल.
१८ फेबुवारी
• चेन्नईच्या आयपीएल मिनी लिलावात ८ संघ तब्बल १९६ कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे.