Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काशी कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला लोकार्पण, भाजपातर्फे महाराष्ट्रातही विविध कार्यक्रम!

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची माहिती

December 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kashi corridor inauguration in maharashtra

मुक्तपीठ टीम

वाराणसी तथा काशी येथील विकास प्रकल्पांचे ( वाराणसी कॉरिडॉर) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी तर्फे देशभर ‘ दिव्य काशी , भव्य काशी ‘ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्रात चार ज्योर्तिलिंगांच्या स्थळांसह सुमारे २१०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमांचे प्रदेश संयोजक कृपाशंकर सिंग यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यावेळी उपस्थित होते. राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील , असेही कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.

 

कृपाशंकर सिंह यांनी सांगितले की , बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी च्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील धर्माचार्य, साधू संत, विद्वान-विचारवंत तसेच उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता, एकता आणि अखंडता यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. राज्यातील ५० साधू , संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.१३ डिसेंबर पासून सुरू होणारे हे कार्यक्रम मकर संक्रांती पर्यंत म्हणजे १४ डिसेंबर २०२२ पर्यंत चालतील.१३ डिसेंबर रोजी सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भव्य कार्यक्रम होणार आहेत. देशभरात सुमारे ५१ हजार ठिकाणी ‘ दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. संपूर्ण देशभर १०,११ व१२ डिसेंबर रोजी सर्व मंदिराच्या तसेच मठ, आश्रमात, अन्य धार्मिक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमात धर्माचार्य, साधू संतांचा गौरव केला जाईल, अशी माहितीही कृपाशंकर सिंह यांनी दिली .


Tags: B J PKashi Corridorkripashankar singhMaharashtraVaranasiकाशी कॉरिडॉरकृपाशंकर सिंहभाजपामहाराष्ट्रवाराणसी
Previous Post

यापूर्वीही झाला होता सीडीएस बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात…

Next Post

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाची जाचक नियमावली नॅशनल मेडिकल कमिशनने त्वरित मागे घ्यावी

Next Post
FMAI 1

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाची जाचक नियमावली नॅशनल मेडिकल कमिशनने त्वरित मागे घ्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!