मुक्तपीठ टीम
लष्कराच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूच्या कुन्नुर या ठिकाणी अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही प्रवास करत होते. मात्र, बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१५ मध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते.
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं! चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्याच हेलिकॉप्टरने प्रवासात!!
लेफ्टनंट जनरल बिपिन रावत दिमापूर येथील लष्कराच्या ३-कॉर्प्सच्या मुख्यालयाचे नेतृत्व करत असताना फेब्रुवारी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. ते दिमापूरहून चित्ता हेलिकॉप्टरमधून निघाले असताना अचानक काही उंचीवर पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळी या दुर्घटनेमागचे कारण इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आले. या अपघातात जनरल रावत किरकोळ जखमी झाले होते.
हेलिकॉप्टर जमिनीपासून केवळ २० मीटर उंचीवर पोहोचू शकल्याचे लष्कराने नंतर उघड केले. यादरम्यान, सिंगल इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये काही गडबड झाली आणि दोन्ही वैमानिकांचे नियंत्रण सुटले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. हवाई दलाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीही केली होती.
सीडीएस बिपीन रावत यांचा अपघात झाला ते Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे तरी कसं?