मुक्तपीठ टीम
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायांची गर्दी झाली. राजकीय नेत्यांनीही घटनाकारांना अभिवादन केले. चैत्यभूमी परिसरात भीम अनुयायांची मोठ्या प्रणाणावर शिस्तबद्ध गर्दी दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
- मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता.
- त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली.
- समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला.
- आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत.
- त्यामागे डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे.
- यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले.
- डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया.
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
- यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्वाची स्थळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र’ आणि ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.
- या कार्यक्रमाचे निवेदन नागसेन कांबळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
- जातिव्यवस्था, अस्पृश्यता व गुलामगिरीने ग्रासलेल्या बहुजन समाजाला आपल्या हक्कांसाठी जागृत करणारे, समताधिष्ठित समाजरचनेसाठी भरीव कार्य करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना #महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
उपमुख्यमंत्री अजित पवार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे.
- या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली.
- समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे म्हणाले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील अभिवादन सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केलं.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीत दिलेलं जे भाषण आहे ते आजही द्यावं अशी आज परिस्थिती आहे.
- संकुचित वृत्ती सोडून आपण एका मार्गानं चालण्याचा विचार केला तर आपण हा देश महान बनवू शकतो. आज देश त्या मार्गानं चाललेला आहे.
- मात्र, काही व्यक्ती संकुचित त्या मार्गावरुन देशाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.
- बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून येत्या १० वर्षात जगातील विकसित देश म्हणून विकसित करु शकतो.
- देशासमोरील सर्व प्रश्नांचं उत्तर संविधानात आहे.
- संविधानात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यामुळं देश एक आहे.
- संधीची समानता या मुळं कोणी मागं राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
- यावेळेस माजी आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.
- यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच दिला.
- त्यांचे हे विचार देशाला एकसंघ ठेवण्यास आणि समाजाला पुढे घेऊन जाणार आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी करून त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचे संरक्षण आपण सर्वांनी करूया असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
- समतेचा विचार, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!