मुक्तपीठ टीम
नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांमुळे नेरळ परिसरातील खारफुटींना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. एन्व्हायरोमेंट लाइफ स्वयंसेवी संस्थेने नवी मुंबई मनपाच्या सहकार्याने या रविवारीही खारफुटी स्वच्छता मोहिम राबवली. संस्थेच्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले. खारफुटीमध्ये वाहून आलेला, काही बेजबाबदार अपप्रवृत्तींनी फेकलेला कचरा शोधला. सर्वांनी मिळून तो कचरा खारफुटीतून जमा केला. दर रविवारी ही संस्था स्वच्छता मोहीम राबवते. या मोहिमेत आजवर शेकडो टन कचरा जमा केला गेला आहे. संस्थेचे धर्मेश पराई यांनी या मोहिमच्या आयोजनासाठी खास मेहनत घेणाऱ्या सर्व स्वयंसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांना श्रेय दिले आहे. सॅनिटरी इंस्पेक्टर विनय नाईक हे दर रविवारी स्वयंसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात.
नवी मुंबई मनपाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूरचे विभाग अधिकारी तांडेल, राजेंद्र सोनवणे, विजय नाईक, एन्व्हायरोमेंट लाइफचे रोहन भोसले, श्रीराम शंकर, मनोज अरोरा, राहुल रासकर, रुद्रा सिंह, पियुश यादव हे सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ: