मुक्तपीठ टीम
सध्या पॅन, आधार आणि मतदार ओळखपत्र हे तिन्ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. छोट्या कामांपासून ते मोठ्या कामांपर्यंत या तिघांचीही सगळीकडे गरज भासते. त्यामुळे प्रत्येकासाठी हे तिन्ही असणे अत्यंत आवश्यक आहे. आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते, जे तुम्हाला १० अंकी क्रमांक यूनिक नंबर देते. ज्यामध्ये तुमचे सर्व वैयक्तिक तपशील दिले जातात. पण अनेक वेळा पॅनकार्ड बनवताना तांत्रिक बिघाडामुळे किंवा वापरून छायाचित्र खराब होते किंवा अस्पष्ट होते. जर तुमच्यासोबतही अशी समस्या उद्भवली असेल तर आता चिंतेची कोणतीच बाब नाही. आता तुम्ही ते अगदी सहजपणे बदलू शकता.
पॅन कार्डवरील छायाचित्र कसं बदलणार?
- तुमच्या पॅन कार्डचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला प्रथम एनडीएलएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- येथे अप्लाय ऑनलाइन आणि रजिस्टर्ड यूजर असे दोन पर्याय दिसतील.
- आता अॅप्लिकेशन टाइपवर जाऊन नवीन पॅनकार्ड घ्यायचे आहे की पॅनकार्ड बदलायचे आहे तो पर्याय निवडावा लागेल.
- जर बदल करायचा असेल तर चेंज्स अॅंड करेक्शन इन द एक्झिंटिंग पॅन डाटा हा पर्याय निवडावा लागेल.
- आता इनडिव्हिज्युअल हा पर्याय निवडा.
- यानंतर, मागितलेली माहिती योग्यरीत्या भरावी लागेल.
- आता कॅप्चा कोड भरावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर केवायसीसाठी तुमचा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर लगेच फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच असे दोन पर्याय दिसतील.
- आता फोटोमध्ये बदल करण्यासाठी फोटो मिसमॅचचा पर्याय निवडावा लागेल.
- त्यानंतर सर्व माहिती भरावी लागेल आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर यूजर्सच्या ओळखीच्या पुराव्यासह इतर कागदपत्रे सादर करावी लागतील.
- डिक्लरेशनवर टिक केल्यानंतर लगेच सबमिट बटणावर क्लिक करा.
- या प्रक्रियेसाठी भारतीय रहिवाशांकडून १०१ रुपये आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी १,०११ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- शेवटी १५ अंकी एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट आउट इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटला पाठवावी लागेल. तसेच तुम्ही या एक्नॉलेजमेंट नंबरसह अॅप्लिकेशन ट्रॅक करू शकता.