मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६६४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९१५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८५,३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,५८,३९,६९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,३७,२८९ (१०.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७९,९१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,१३२ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,३५७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,१९८
- उ. महाराष्ट्र ०,०६७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०२९
- कोकण ०,००२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०११
नवे रुग्ण ०,६६४
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६६४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,३७,२८९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १९३
- ठाणे १८
- ठाणे मनपा ३०
- नवी मुंबई मनपा ३५
- कल्याण डोंबवली मनपा २२
- उल्हासनगर मनपा २
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ११
- पालघर १
- वसईविरार मनपा १३
- रायगड १०
- पनवेल मनपा २०
- ठाणे मंडळ एकूण ३५७
- नाशिक १०
- नाशिक मनपा १५
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३१
- अहमदनगर मनपा ६
- धुळे ०
- धुळे मनपा २
- जळगाव २
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ६७
- पुणे ४९
- पुणे मनपा ८४
- पिंपरी चिंचवड मनपा ३५
- सोलापूर ५
- सोलापूर मनपा ५
- सातारा १३
- पुणे मंडळ एकूण १९१
- कोल्हापूर ३
- कोल्हापूर मनपा १
- सांगली ३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण ९
- औरंगाबाद ७
- औरंगाबाद मनपा ३
- जालना २
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १३
- लातूर ०
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ५
- बीड ४
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १६
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती १
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ५
एकूण ६६४
(नोट:- आज राज्यातील कोविड रूग्ण संख्येचे दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंतची रेकाँसिलिएशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दुहेरी नोंदी वगळणे,जुने मृत्यू अद्ययावत करणे या ताळमेळ प्रक्रियेत आज राज्यातील एकूण रुग्ण संख्येत ५९६ ने तर बरे झालेले रुग्ण संख्येत ८७० ने घट झाली आहे.तर राज्याची एकूण मृत्युसंख्या ८४ ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ओमिक्रॉन व्हेरियंट सर्वेक्षण – एकूण ३० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी
दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोविड १९ विषाणूच्या व्हेरियंटला ओमायक्रॉन असे नाव दिले असून सदर व्हेरीयंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे नमूद केले आहे. विषाणू मधील या जनुकीय बदलामुळे त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.या बदलामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढल्याचे सध्या दिसत असून त्यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का किंवा हा नवा विषाणू प्रतिकार शक्ती भेदून संसर्ग करू शकेल का, याबाबत आताच निश्चित भाष्य करणे कठीण असले तरी येत्या दोन आठवड्यात या बदल अधिक माहिती मिळू शकेल.
या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ओमिक्रॉन देशातून आलेल्या सर्व २८२१ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २ नमुने कोविड बाधीत आढळलेले आहेत तर इतर देशांमधून आलेल्या ११,०६० प्रवाशांपैकी २२४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत त्यातील १ प्रवाशी कोविड बाधित आढळला आहे.
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु असून विमानतळ आणि क्षेत्रिय अशा दोन्ही सर्वेक्षणातून आतापर्यंत एकूण ३० नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १४ नमुने एन आय व्ही पुणे येथे तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०३ डिसेंबर २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.