मुक्तपीठ टीम
एकदा पोलिसांनी आपल्या अंगावर वर्दी चढवली की ते ढालीसारखे आपले कर्तव्य निभवत असतात. ईमानदार पोलिसांचा अर्थ हा त्यांची लाच न करता इतरांच्या हक्कांसाठी, नागरिकांसाठी कर्तव्य निभावणे. मात्र असं असताना पिंपरी चिंचवडमध्ये याच्याच उलट घडलं आहे. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
- बलात्कारा प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.
- तक्रारदाराच्या विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल आहे.
- या तक्रार अर्जाची चौकशी आरोपी पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्याकडे असून अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली.
- त्यावरुन तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.
- २५ आणि २६ नोव्हेंबरला पडताळणी केली असता आरोपी सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ७० हजार रुपये ठरवले.
- २ डिसेंबरला आरोपी देसाईने लाच स्वीकारली आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा पथक पुढे सरसावलं असता, त्यांनी बाईक बेदरकारपणे चालवून लाचेच्या रकमेसह पळ काढला.
- आरोपी महिला पोलीस यांना ताब्यात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा नोंद करण्यात आला.
२८ वर्षीय महिला पोलीस अटकेत
- पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी महिलेला अटक केली आहे.
- हेमा सिद्धराम सोळुंके असं अटक केलेल्या २८ वर्षीय पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे.
- लाचेची ७० हजार रुपये रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्ण देसाई हा एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन फरार झाला आहे.