Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘माविम’ संचलित बचतगटांचे महासंघ देशपातळीवर अव्वल

December 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
MAVIM

मुक्तपीठ टीम

  • ठाणे जिल्ह्यातील आनगाव येथील क्रांतीज्योती सीएमआरसीला देशपातळीवरील प्रथम पुरस्कार
  • विभाग पातळीवर उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय

 

नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील बचत गटांच्या महासंघांसाठी झालेल्या सर्वंकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखरसंस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) संचालित बचतगटांच्या महासंघाने अव्वल स्थान पटकावले आहे.

MAVIM

नाबार्डचे अध्यक्ष जी आर चिन्ताला आणि मुख्य महाव्यवस्थापक विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘माविम’च्या ठाणे जिल्ह्यातील क्रांतीज्योती सीएमआरसी आनगावला एक लाख रू.रकमेच्या रोख पारितोषिकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विभाग पातळीवर ‘माविम’च्या उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत ‘माविम’च्या सातत्यपूर्ण यशात उल्लेखनिय भर टाकली. या पुरस्‍काराची रक्‍कम प्रत्येकी रु. २०,०००/- आहे. भारतातील पात्र १२० हून अधिक SHG महासंघांपैकी १३ महासंघांची निवड करण्यात आली.

यावेळी ”व्हीजन २०३०” अंतर्गत भारतातील बचत गट व बचतगटांच्या महासंघांचे पुनरूज्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात ‘माविम’च्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसूम बाळसराफ यांनी माविमसह महासंघांची भविष्यकालीन उपयुक्तता यावरही प्रकाश टाकला.

या कार्यक्रमासाठी व पुरस्कार स्विकारण्यासाठी क्रांतीज्‍योती लोकसंचलित साधनकेंद्र, आनगावचे अध्‍यक्ष शुभांगी शशिकांत जाधव,  अंजली कमलाकर ठाकरे – खजिनदार, अरुणा विजय गायकवाड – व्यवस्थापक, गोंदिया जिल्‍ह्यातील उत्‍कर्ष लोकसंचलित साधन केंद्राचे मोनीता राणे, व्यवस्थापक तुलसी चौधरी अध्यक्षा व भंडारा जिल्‍ह्यातील तेजस्विनी लोकसं‍चलित साधनकेंद्राचे भारती झंझाड – अध्यक्षा, वनमाला बावनकुळे – व्यवस्थापक  हे प्रतिनिधी उपस्थित होते.

कुसुम बाळसराफ, महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प), माविम यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. श्रीमती शितल लाड, विकास अधिकारी व  श्रीमती अस्मिता मोहिते, जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, ठाणे ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

देशपातळीवरील ‘माविम’च्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘माविम’ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्यासह माविम टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Tags: Jyoti ThackerayNABARD and the Society for the Advancement of WomenVision 2030ज्योती ठाकरेनाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटीमाविमव्हीजन २०३०
Previous Post

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच निवडणूक आयोगाचा परिसंवाद

Next Post

“शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे” – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Next Post
ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन

"शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे गरजेचे" - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!