मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यावरून त्यांना एचएन रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे होते.
मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया यशस्वी
- काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता.
- हा त्रास वाढल्यामुळे रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
- आधी वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्यानं विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या.
- या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली.
- त्यानंतर मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
- रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी आपली जबाबदारी सोडली नाही.
- रुग्णालयात असतानाही त्यांचे काम सुरुच होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यांकडून ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस
- उद्धव ठाकरेंच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर सीएमओने एक निवेदन जारी केले होते.
- मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ऑपरेशननंतर त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली होती.
- विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
- ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी सिंह यांनी फोनवरुन संवाद साधत ही चौकशी केली होती.